नागपूर : रामटेकचे भाजप आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. निवेदन देण्यासाठी गेलेल्या महिलांना अपशब्द वापरल्या प्रकरणी रेड्डींविरोधात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


आज दुपारी भाजप आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांना त्यांच्या कार्यालयात काही महिला एका मायक्रो फायनान्स कंपनीकडून फसवणूक झाल्याचं निवेदन देण्यासाठी या महिला गेल्या होत्या. त्यावेळी महिलांबद्दल रेड्डी यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात येतोय.

या प्रकरणी महिलांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आमदार रेड्डींच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी महिलांविरोधात कार्यालयात गोंधळ घातल्याची तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रार दाखल करुन घेतली असून, या प्रकरणी महिलांनी न्यायालयातही दाद मागण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.