कोल्हापूर : पूरग्रस्तांना 100 टक्के नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात सर्वपक्षीयांनी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चात माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील सहभागी झाले होते. शेतकरी, व्यापारी, छोटे दुकानदार, व्यावसायिक यांना सरकारनं 100 टक्के नुकसान भरपाई देण्याची मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.

कोल्हापुरातल्या दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. यात हजारो शेतकरी सहभागी झाली होते. हातात वाळलेला ऊस घेऊन महिला आणि पुरुष शेतकरी मदतीच्या मागणीसाठी या आंदोलनात सहभागी झाले होते. दसरा चौकातून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान पूरग्रस्तांच्या मागणीसाठी सरकार सकारात्मक आहे. आंदोलन करुन काहीही साध्य होणार नाही असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.