संघाचा विजयादशमी उत्सव, 'नोबेल' विजेते कैलास सत्यार्थी प्रमुख पाहुणे
एबीपी माझा वेब टीम | 18 Oct 2018 08:10 AM (IST)
यंदा संघाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी उपस्थित आहेत.
नागपूर: विजय दशमी दसऱ्यानिमित्त नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाबाहेर संघस्वयंसेवकांनी पथसंचलन केलं. यंदा संघाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी उपस्थित आहेत. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन झालं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार विकास महात्मे, केंद्रीय मंत्री के अल्फोन्स यांच्यासह बहुतेक जण संघाच्या गणवेशात हजर राहिले. संघाच्या स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध संचलन केलं. बॅण्डच्या तालात स्वयंसेवकांनी मान्यवरांना सलामी दिली.