नाशिक : मुक्त विद्यापीठांचे कोणतेही अभ्यासक्रम रद्द झालेले नाहीत, असा स्पष्टीकरण विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने दिलं आहे. ज्या अभ्यासक्रमांमध्ये त्रुटी आढळून येतील त्या भरून काढण्यासाठी विद्यापीठांना एक महिन्याची मुदत देण्यात येणार आहे.


अभ्यासक्रम रद्द झाल्याचं वृत्त प्रसारित होताच मुक्त विद्यापीठांना आज यूजीसीकडून पत्र प्राप्त झालं. या संबंधित अधिक माहिती 16 ऑगस्टला यूजीसीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी चिंता करु नये, असंही आवाहन करण्यात आलं आहे.

यूजीसीने सन 2018-19 साठी विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या मुक्त विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीमध्ये मुंबई दूर आणि मुक्त अध्ययन केंद्र (आयडॉल) संस्थेसह 35 संस्थांची नावेच नसल्याने त्यांची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे, असं वृत्त काल समोर आलं होतं.

या वृत्तानंतर एकच खळबळ उडाली होती. तसेच विद्यार्थ्यांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर यूजीसीने हे स्पष्टीकरण देत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.