पंढरपूर : माझ्यावर सरकारने कितीही केसेस टाकल्या तरी माझं तोंड बंद होणार नाही. मी कोणालाही घाबरत नाही, असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.
आयुष्यात आजवर अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यामुळे मी कोणालाच भीत नाही, असं सांगत भुजबळांनी हिंदीतील एक शेरही उपस्थितांना ऐकवला. सांगोला येथे माळी समाजाच्या राज्यव्यापी आधिवेशनासाठी भुजबळ आले होते.
पाच राज्यांचा नुकताच लागलेला निकाल हा देशातील विविध भागातील राज्यांचा असून सर्वच ठिकाणी भाजपचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे कितीही लाख कोटीची कर्जमाफी दिली तरी जनता याना साफ केल्याशिवाय राहणार नसल्याचं, असं म्हणत छगन भुजबळांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.
देशात 70 वर्षांपासून सुरु असलेली न्यायालये, सीबीआय, रिजर्व बॅंक या सारख्या संस्थांची मोदी सरकारने वाट लावली. गेली साडेचार वर्ष हे सर्व पाहणारी जनता यांना केंद्र आणि राज्याच्या सत्तेतून हद्दपार करेल, असं भाकीतही भुजबळांनी व्यक्त केली.