मुंबई:  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत आल्यानंतर ते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतील... त्यानंतर ते शरद पवारांची दुपारी अडीच वाजता भेट घेणार आहे. विशेष म्हणजे नितीश कुमार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव देखील येणार आहेत. अनेक दिवसांपासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मुंबई दौऱ्याची चर्चा सुरू होती.


देशात भाजपला रोखायचे असेल तर विरोधी पक्षांची एकजूट होणं गरजेचं आहे. यामध्ये आता नितीश कुमार यांनी पुढाकार घेत विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी दिल्लीत विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीसाठी घेतल्यानंतर आता महाराष्ट्रातले दोन प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीला नितेश कुमार उद्या मुंबईत दाखल होणार आहेत.  लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकांना आता केवळ एक वर्ष बाकी असताना विरोधी पक्षांकडून देखील या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.  पंधरा दिवसांपूर्वी दिल्लीत नितीश कुमार यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर ते मुंबई दौऱ्यावर उद्या येत आहेत


नितीश कुमार यांच्या सोबत कोण असणार आहे



  • उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव

  •  देवेशचंद्र ठाकूर, सभापती विधान परिषद

  •  संजय कुमार झा, मंत्री 


 नितेश कुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची नुकतीच दिल्लीमध्ये भेट घेतली आणि त्यानंतर आता विरोधी पक्षाची एकजूट करण्यासाठी नितेश कुमार यांना पुढाकार घेतल्याची चर्चा सुरू झाली


 याच चर्चेचा पुढचा अंक म्हणून उद्या नितेश कुमार महाराष्ट्रातल्या दोन महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. उद्या दुपारी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेणार आहेत


दौरा कसा असेल?



  • दुपारी साडे बारा वाजता मुंबई विमानतळावर आगमन

  •  दुपारी 1 पर्यंत मातोश्री निवास्थानी आगमन

  • सव्वा दोन वाजता माध्यमांसमोर येण्याची शक्यता

  •  अडीच वाजता सिल्व्हर ओकचा दिशेने रवाना

  •  3 वाजता शरद पवार यांच्यासोबत भेट

  •  साडे तीन वाजता माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता


 सध्या देशात काँग्रेसला सोबत घेऊन आणि काँग्रेस शिवाय विरोधी पक्षाची मूठ बांधण्यासाठी विविध पक्ष प्रयत्न करताना पाहिला मिळतं आहे. अशावेळी नितीश कुमार यांनी मात्र सर्वच विरोधी पक्ष एकसंघ बांधण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे


 एबीपी माझा ला मिळालेल्या माहितीनुसार नितीश कुमार यांच्या माध्यमातून याच महिन्यात दिल्लीत विरोधी पक्षाची बैठक बोलवण्यात येणारं असल्याची माहिती आहे. तसेच बिहारची राजधानी पठणा येथे देखील एक जाहीर सभा घेण्यात येणार आहे. याचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट आहे. आता मी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने रणनीती तयार केली असून देशातल्या प्रत्येक मतदारसंघांमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते जाताना पाहायला मिळत आहेत. अशावेळी विरोधी पक्षाचा अद्याप चेहरा कोण असेल हे देखील ठरलेलं पाहायला मिळत नाही त्यामुळे 2024 च्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष भाजपला नामोहरम करण्यात यशस्वी होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे