पुणे: वेळप्रसंगी विहिरीत जीव देईन, मात्र काँग्रेसमधे प्रवेश करणार नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री निती गडकरी यांनी भाजपा प्रदेश कार्यकारिणी समारोप कार्यक्रमात केले.


 

यावेळी त्यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवरही जोरदार हल्ला चढवला. तसेच भाजप हा पक्ष कुणाच्याही मनाप्रमाणे चालत नाही. किंवा परिवाराच्या हातात पक्षाची सत्ता नाही. मोदी, शाह, अडवाणी, वाजपेयी किंवा मुख्यमंत्री यांच्यापैकी कुणाही एकाच्या मनाप्रमाणे पक्ष चालत नाही. असे सांगितलं.

 

ते पुढे म्हणाले, राजकारण आरामात कधीच होत नसतं. ते केवळ क्रांतीतूनच होतं असतं. संघटनेच्या प्रक्रियेतून तावून-सुलाखून बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांनाच नेतृत्व मिळतं. मला आजपर्यंत अनेक मोठ्या नेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली. वाजपेयी, अडवाणी, गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत मी काम केलं आहे.

 

ज्यावेळी सत्ता असते त्यावेळी कार्यकर्त्यांची काळजी घेणं आवश्यक असतं. वाईट दिवसांमध्ये मनोबल टिकवण सोपं. मात्र चांगल्या दिवसांत ते टिकवणं आव्हानात्मक आहे.त्य़ामुळे राजकारणाच्या रंगात रंगून आपला मूळ रंग जाऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी कार्यकत्यांना केले.