पुणे: ‘राज्याचं सिंचनक्षेत्र जोपर्यंत पन्नास टक्यापर्यंत जात नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणं अशक्य आहे.’ असं मत केंद्रीय वाहतूक, दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. पुण्यातील डेक्कन एज्यूकेशन सोसायटीच्या वतीने राजर्षी शाहु पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीला आघाडी सरकारला जबाबदार धरलं आहे.


मागच्या सरकारने केलेल्या चुकांमुळेच शेतकऱ्याची वाईट अवस्था झाली आहे. असा आरोप गडकरींनी केला. तसंच राज्यातील सिंचन क्षेत्रासाठी केंद्र सरकारने 36 हजार कोटी मंजूर केल्याची माहिती गडकरींनी यावेळी दिली.

पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने राजर्षी शाहु पुरस्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षीचा हा पुरस्कार राष्ट्रीय स्वयसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र यांना जलसंधारण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबददल त्यांना देण्यात आला. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते.