Nitin Gadkari News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक बोलण्याच्या शैलीमुळं नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी राजकारणातील भ्रष्टाचाराबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात गडकरींनी म्हटलं आहे की, जर एकही कंत्राटदाराने गडकरींना कमिशन देऊन काम मिळवल्याचे म्हटले. तर राजकारण सोडून देईल. पैसा कमावणं चूक नाही, मात्र राजकारण हे पैसा कमवण्याचे साधन नाही असं नितीन गडकरी म्हणाले. नागपुरात काल रात्री आयोजित भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी ई लायब्रेरीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले की, देशभरात 50 लाख कोटी रुपयांचे रस्त्याचे जाळे विणले. नागपुरात 86 हजार करोड रुपयांचे काम केले, पण एकही कंत्राटदाराकडून कमीशन घेतले नाही. जरी एक कंत्राटदाराने गडकरींना कमिशन देऊन काम मिळवल्याचे म्हटले, तर राजकारण सोडून देईल असे वक्तव्य गडकरी यांनी केले.
यावेळी त्यांनी महापालिकेने उभारलेल्या लायब्रेरीच्या चांगल्या बांधकाम आणि डिझाईनचे कौतुक केले. पैसे कमावणे चुकीचे नाही मात्र राजकारणाचा उद्दिष्ट पैसे कमावणे असू नये असे ही गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी नगरसेवकांना लक्ष्मी दर्शन करू नका असा टोला लगावत पैसे कमवायचे असेल तर माझ्याकडे या, मी तुम्हाला व्यवसाय उभारण्यास मदत करेल. मात्र राजकारणातून पैसा कमवण्याचा उद्दिष्ट ठेवू नका असा सल्लाही त्यांनी नगरसेवकांना दिला.
लायब्रेरीच्या कामाचं कौतुक करत गडकरी म्हणाले की, हे काम अत्यंत चांगलं केलं आहे. महापालिकेचं रेप्युटेशन खराब केलं आहे, एवढं चांगलं काम केलं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :
- उत्तर प्रदेशात बस उडणार! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण चर्चेत
- नागपूरमध्ये काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने! गडकरींच्या घरासमोर आंदोलनानंतर तणाव
- Nitin Gadkari : गडकरी म्हणतात, ''विमानंही उतरू शकतील असे 20 रस्ते मी देशात बांधले!"