Nitin Gadkari : तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या खेड-भीमाशंकर राज्य रस्त्यास (Khed Bhimashankar Rroad) राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. महाराष्ट्रातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले क्षेत्र भीमाशंकर येथे देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. 


खेड-भीमाशंकर राज्य रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती नितीन गडकरी यांनी ट्विट करून दिली आहे. खेड-भीमाशंकर हा राज्य रस्ता 70 किलोमीटर एवढ्या लांबीचा आहे. या महामार्गामुळे राजगुरूनगर (खेड), चास, वाडा, तळेघर ही महत्वाची शहरे जोडली जाणार असून या महामार्गामुळे भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांसाठी दळणवळण सोयीचे होईल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी  दिली आहे. 


 






"भीमाशंकर आणि माळशेज घाट हे पर्यटन वर्तुळ शक्य होईल. तसेच भीमाशंकर परिसरातील शेतीमाल मुंबई बंदराकडे पोहोचवणे सुलभ होईल. या महामार्गमुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होईल. त्यामुळे परिसराचा शैक्षणिक व औद्योगित विकास होण्यास मदत होईल, त्यामुळे खेड- ते भीमाशंकर या 70 किमीच्या राज्य रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले.  


महत्वाच्या बातम्या


महाराष्ट्रातील पाच पैकी दोन ज्योतिर्लिंग राष्ट्रीय महामार्गाने जोडणार, राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा; नितीन गडकरींची घोषणा