‘आम्ही पाठिंबा काढू’ याची गिनीज बुकमध्ये नोंद व्हावी, नितेश राणेंचं पत्र
एबीपी माझा वेब टीम | 14 Jun 2017 09:41 PM (IST)
मुंबई: शिवसेनेवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या काँग्रेस आमदार नितेश राणेंनी आता एका अनोख्या पद्धतीनं शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘राज्य सरकारमधून आम्ही पाठिंबा काढू. अशी घोषणा करण्यात उद्धव ठाकरे यांनी विक्रम केला त्याची नोंद गिनीज बूकमध्ये नोंद व्हावी.’ अशा आशयाचं पत्र आमदार नितेश राणे यांनी लिहिलं आहे. गिनीज बुकला आपण लिहलेलं हे पत्र हाच अर्ज समजण्यात यावा असंही यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. नेमकं काय म्हटलं आहे या पत्रात? दरम्यान, आतापर्यंत शिवसेनेनं सत्तेत बाहेर पडण्याबाबत अनेकदा वक्तव्य केलं आहे. पण शिवसेना अद्यापही भाजपबरोबर सत्तेत कायम आहे. त्यामुळेच आता अशी खोचक टीका नितेश राणेंनी केली आहे. संबंधित बातम्या : ...तर शिवसेना सत्तेचीही पर्वा करणार नाही: उद्धव ठाकरे