'आम्ही शिवसेनेत प्रवेशाचा प्रस्ताव ठेवला आणि ठाकरेंनी तो प्रस्ताव धुडकावल्याचं वृत्त एका मराठी दैनिकाने दिलं. तुम्ही वांद्र्याचा साहेब आणि त्यांच्या पीएलाच खरी गोष्ट का विचारत नाही' असा सवाल नितेश राणेंनी ट्वीटमधून उपस्थित केला.
https://twitter.com/NiteshNRane/status/860316782946656256
'कोण कोणाचा पाठलाग करत होतं हे ठरवा. नाहीतर एक दिवस आमच्यावरच वस्त्रहरण करण्याची वेळ येईल.' असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरुन आहेत. मात्र राणेंनी हे वृत्त फेटाळून लावलं होतं. त्यानंतर त्यांच्या कथित सेनाप्रवेशाबाबत एका वृत्तपत्राने बातमी छापली होती.
https://twitter.com/NiteshNRane/status/860317600533884929
“मी अहमदाबादमध्ये होतो, पण कोणालाही भेटलो नाही,” असं सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी एप्रिल महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत भेट झाल्याचं वृत्त फेटाळलं होतं.
अहमदाबादमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत एकाच कारमध्ये प्रवास केल्याची दृश्य समोर आल्यानंतर नारायण राणेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राणेंनी ही दृश्यं खोटी ठरवत कोणाशीही भेट झाली नसल्याचा दावा केला होता.
“मार्केटमध्ये चांगला माल असेल, तर सगळे विचारतातच ना,” अशी कोपरखळी नारायण राणेंनी मारली होती. “भाजपकडून ऑफर येते, मात्र त्यावर अजून विचार केलेला नाही. भाजपच्या ऑफरला मी नकारही दिला नाही आणि होकारही दिला. कुणीही यावं आणि माझ्याशी बोलावं, एवढा स्वस्त मी नाही,” असं नारायण राणेे म्हणाले होते.
अहमदाबादमध्ये नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत प्रवास करताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. महत्त्वाचं म्हणजे याच गाडीत पुढच्या सीटवर नारायण राणे यांचे सुपुत्र आणि आमदार नितेश राणेही असल्याचं दिसत होतं.
‘माझा’च्या हाती लागलेल्या दृष्यांमध्ये नारायण राणे आणि मुख्यमंत्री मागच्या सीटवर बसललेले स्पष्ट दिसतात. तर नितेश राणे पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला पाहायला मिळतात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांची अहमदाबादमध्ये भेट घेतली होती. मात्र राणेही त्याच दिवशी अहमदाबादमध्ये होते. त्यामुळे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने जोर धरला होता.
संबंधित बातम्या :
माझा मित्र येतोय, फडणवीसांच्या सूचनेनंतर साक्षात राणेच हजर!
राणे अहमदाबादहून मुंबईकडे रवाना, शाह-फडणवीसांशी भेट?
...तर केंद्रीय मंत्री झालो असतो : नारायण राणे
भाजपची ऑफर जुनीच, अहमदाबादेत कोणालाही भेटलो नाही : राणे
अहमदाबादेत कोणालाही भेटलो नाही - राणे
पुढच्या सीटवर नितेश, मागच्या सीटवर राणे-मुख्यमंत्री!