नागपूर : ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी इंडिया आघाडीची बैठकबाबत भाष्य करत देशात निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यावा अशी मागणी करत मोदी सरकारवर टीका केली. टीकेला भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. ज्यावेळी पंतप्रधान मोदीसाहेबांच्या नेतृत्वात 2014-2019 मध्ये देशात 18-19 खासदार निवडून येत होते, तेव्हा तुम्हाला या व्हीव्हीपॅट बद्दल आक्षेप घ्यावास वाटला नाही का? तेव्हा ईव्हीएममध्ये घोळ वाटला नाही का? जेव्हा खासदर निवडून येत होते तेव्हा सगळे ठिक होते. मात्र आज एक खासदार निवडून येण्याचे वांदे असतांना उगाच ईव्हीएमच्या नावावे शेबड्यासारखे रडत बासायचे. अशा शब्दात नितेश राणेंनी संजय राऊतांवर टीका केली. हिम्मत असेल तर तुम्ही मैदानात या, ज्यांनी कधी साधी ग्रामपंचायत देखील लढवली नाही ते आज पंतप्रधान पदाचे स्वप्न बघत असेल, तर हा 2023 चा शेवटचा विनोद आहे. असा टोला देखील नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. ते नागपुरात बोलत होते.
दिघा स्टेशन, उरण रेल्वेलाईन केवळ व्हीआयपींच्या अभावी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. आदित्य ठाकरेंनी रेल्वेमंत्र्यांवर कडाडून टीका करत रेल्वेमंत्री मुंबईतल्या प्रकल्पांबाबत बेपर्वा आहेत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. या टीकेवर देखील आमदार नितेश राणेंनी प्रतीउत्तर देत आदित्य ठाकरेंवर टिकास्त्र सोडले आहे. रेल्वेमध्ये काय घंटा वाजविण्या करीता टीसी पदाची नौकर भरती निघाली आहे का, त्यासाठी त्यांचे ते वक्तव्य असेल. आता रेल्वे मंत्र्यांनी काय करावे हे भायखळाच्या पेंगवीनचे ऐकावे लागले म्हणजे देशाची फार चिंता करावी लागेल. असे देखील ते म्हणाले.
हलाल प्रमाणपत्रावर बंदची मागणी
मराठा आरक्षण विषयात सरकार फार सकारात्मक आहे. जरांगे पाटील आणि सरकारमध्ये योग्य दिशेने चर्चा होईल आणि एकंदरीत ही कोंडी आहे ती सुटेल. मुख्यमंत्रीच्या भाषणाने हा मार्ग सुखकर झाला आहे, असा आम्हाला विश्वास आहे. हलालच्या नावाने देशातल्या हिंदू समाजाच्या विरुद्ध षडयंत्र रचण्याचे काम या हलाल जिहादच्या नावाने सध्या सुरू आहे. या हलालच्या नावाने प्रमाणपत्र देण्यातून जमा होणारा पैसा देश विघातक कृत्यासाठी वापरला जातो. लव जिहादसाठी हा पैसा वापरला जातो. त्याची असंख्य उदाहरण आमच्या जवळ आहे. ज्याप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारने जे हलाल बद्दलचे प्रमाणपत्र देतात त्यांच्यावर बंदी घातली आहे. त्यातील दोन संस्था या महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे या दोन संस्थावर महाराष्ट्र सरकारने बंदी घालावी. असे पत्र मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिली आहे. अशी माहिती देखील नितेश राणेंनी बोलतांना दिली.
हे ही वाचा :