मराठा मोर्चा सरकारविरोधी आहे. त्यामुळे सरकारविरोधी मोर्चाचं निवेदन सरकारलाच का द्यायचं, मराठा मोर्चाचं निवेदन स्वीकारण्यासाठी सरकारनं जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांना पाठवू नये, असा सल्ला नितेश राणे यांनी दिला. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
कोल्हापूर मोर्चादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. तसंच प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात असतील असा निर्णयही घेण्यात आला आहे. या निर्णयाला आता काँग्रेसनं विरोध केला आहे.
मराठा मोर्चा: कोल्हापूर आयोजकांचा पालकमंत्र्यांना विरोध?
मुंबईतल्या मोर्चाचं नियोजन करण्यापेक्षा थेट तारीख जाहीर करा, नियोजन आपोआप होईल, असा सल्लाही त्यांनी आयोजकांना दिला.
कोल्हापुरातील मराठा मोर्चा आयोजकांनी आमचं निवेदन हे जिल्हाधिकाऱ्यांनाच देऊ, असा निर्णय घेतला आहे. “राज्यात सर्व ठिकाणी ज्या पद्धतीने मोर्चे निघत आहेत, त्याच पद्धतीने कोल्हापुरातही मोर्चा निघेल. निवेदन स्वीकारण्यासाठी कोण येत आहे हे आम्हाला माहित नाही. यापूर्वी सर्व जिल्ह्यातील निवदेनं हे त्या – त्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारलं. त्यामुळे कोल्हापुरातही निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाच देणार” असं मराठा मोर्चाच्या आजोयकांनी सांगितलं.