कणकवली : महामार्ग बाधितांच्या समस्या मांडण्यासाठी काँग्रेस आमदार नितेश राणेंनी थेट दिल्ली गाठली आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. महामार्ग बाधितांना मिळणाऱ्या अल्प मोबदल्यासंदर्भात नितेश राणेंनी गडकरींसमोर व्यथा मांडली.
कणकवली शहरातील महामार्ग बाधितांना मिळणाऱ्या अल्प मोबदल्याकडे आमदार नितेश राणे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले. गडकरी यांची दिल्ली येथील ट्रान्सपोर्ट भवनमध्ये भेट घेतली.
https://twitter.com/NiteshNRane/status/930488540785467393
दिला गेलेला मोबदला 2013 च्या रेडी रेकनरनुसार असल्यामुळे ती रक्कम तुटपुंजी आहे. सह्यद्रीवर झालेल्या बैठकीत महामार्ग बाधितांना पाहिजे तेवढा मोबदला देतो, या नितीन गडकरींच्या वक्तव्याची आठवण करुन देत भूसंपादन कायद्यानुसार 2017 च्या रेडी रेकनरनुसार नुकसान भरपाई मिळावी. कणकवली शहराचा पुन्हा सर्व्हे करण्याची मागणी नितिन गडकरी यांच्याकडे केली.
गडकरींनी आवश्यक ते बदल करुन हायवे बाधितांना समाधानकारक मोबदला मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याच्या राष्ट्रीय महामार्गाचे केंद्रीय अधिकारी देशपांडे सूचना यांना दिल्या. 27 नोव्हेंबर रोजी केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांसमक्ष जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे नितेश राणे यानी सांगितले.
महामार्ग बाधितांसाठी नितेश राणे थेट दिल्लीत, गडकरींची भेट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Nov 2017 06:39 PM (IST)
कणकवली शहरातील महामार्ग बाधितांना मिळणाऱ्या अल्प मोबदल्याकडे आमदार नितेश राणे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले. गडकरी यांची दिल्ली येथील ट्रान्सपोर्ट भवनमध्ये भेट घेतली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -