कोल्हापुरात निर्भया पथकाचा टवाळखोर तरुणांना दणका
एबीपी माझा वेब टीम | 31 Dec 2018 04:02 PM (IST)
शहरातील विवेकानंद कॉलेज परिसर आणि रंकाळा परिसरात निर्भया पथकानं कारवाई केली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या निर्भया पथकाने हुल्लडबाज तरुणांवर कारवाई केली आहे. शहरातील विवेकानंद कॉलेज परिसर आणि रंकाळा परिसरात निर्भया पथकानं कारवाई केली आहे. विवेकानंद महाविद्यालयाच्या परिसरात निर्भया पथकाची गाडी आल्यावर काही हुल्लडबाज तरुणांची चांगलीच पळापळ झाली. महाविद्यालयात आगावपणा आणि हु्ल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पथकाने कॉलेजच्या गेटवर उठाबशा काढण्यास सांगितल्या तर काही जणांना अंगठे धरण्याची शिक्षा देत समज देण्यात आली. प्रत्येक शहरात टवाळखोर तरुणांवर नजर ठेवण्यासाठी निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ही कारवाई करण्यात आली आहे.त्यामुळे टवाळखोरांनी निर्भया पथकाचा चांगलाच धसका घेतला आहे.