Nagpur: नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत लुटमारीच्या नऊ घटना घडल्याची माहिती समोर आलीय. या घटनेत चार वृद्धांसह अनेक सामन्य नागरिकांची भररस्त्यात लुट करण्यात आलीय. दरम्यान, सामान्य नागरिकांचे लाखोंचे दागिने आणि मौल्यवान वस्तू हातातून हिसकावून चोरट्यांनी पळ काढला आहे. जिल्ह्यात दोन दिवसात नऊ जणांसोबत घडलेल्या लुटमारीच्या घटनेनंतर नागपूर पोलीस सुरक्षा देण्यात अपयशी ठरतायेत का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.


मिळालेल्या माहितीनुसार, 24 मार्च रोजी नागपूरच्या अंबाझरी पोलिस स्टेशन अंतर्गत सीपी क्लब जवळ 75 वर्षांच्या श्रीपाद पाटील नावाच्या वृद्धाचे 70 हजार रुपयांचे दागिने दुचाकीवर आलेल्या दोघांनी लुटले. त्याच दिवशी एमआयडीसी टी-पॉईंटजवळ 62 वर्षाच्या सुरेश भगत नावाच्या वृद्धाला ही 1 लाख 80 हजार रुपयांनी लुटण्यात आले.बेलतरोडी पोलीस स्टेशन अंतर्गत मनिष नगर भागात अशोक देशभ्रतार नावाच्या 65 वर्षीय वृद्धाकडून 1 लाख 28 हजार रुपयांचे दागिने लुटून नेण्यात आले. तर हुडकेश्वर परिसरात कृष्णराव बोकडे यांच्याकडूनही 95 हजार रुपयांचे दागिने लुटून नेण्यात आले. याशिवाय गेल्या दोन दिवसात नागपूर शहरात पायी जाणाऱ्याकडून मोबाईल हिसकावल्याच्या पाच घटना घडल्या आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. 


यामुळे एका बाजूला नागपुरात गुन्हेगारी कमी झाली असा दावा करत आपली पाठ थोपटून घेणारे पोलीस स्त्यावर चालणार्‍या सामान्य नागपूरकरांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. टीव्ही फुटेजच्या आधारे नागपूर पोलिसांनी लोकमान करणाऱ्यांचा शोध सुरू केला असून हे एकच टोळीतील लुटारू असावेत असा पोलिसांचा संशय आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha