मुंबई : भाजपचे नेते (BJP) आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी अचानकपणे राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. निलेश राणे यांनी असा तडकाफडकी निर्णय का घेतला, याचे कारण आता समोर आले आहे. भाजपमधील एका बड्या नेत्यावर नाराज असल्यानं निलेश राणेंनी हा राजकीय निवृत्तीचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र असलेले निलेश राणे माजी खासदार राहिले आहेत. पण सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या राजकारणात इतरांची जास्त ढवळाढवळ होत असल्यानं केल्या काही दिवसांपासून त्यांचे भाजपच्या नेत्यांसोबत खटके उडत होते. निलेश राणे यांनी राजकीय निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर आता भाजपचे बडे नेते निलेश राणे यांची मनधरणी करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. 


आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. निलेश यांनी आपल्या कुटुंबियांनाही याची कल्पना न देता निवृत्तीचे ट्वीट केले. निलेश राणेंनी घेतलेल्या या निर्णयामुळे समर्थकांमघ्ये नाराजी पसरली असून समर्थक निलेश राणेंची भेट घेणार आहेत. 






निलेश राणेंनी नेमकं काय म्हटले?


निलेश राणे म्हणाले,  मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या 19-20 वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. भारतीय जनता पक्षामध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.  


मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.  


इतर महत्त्वाच्या बातम्या :