Nilesh Rane on Raj Thackeray and Uddhav Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लाचारी बद्धल बोलायचं झाला तर राज ठाकरेंनी स्वतःच्या भावाकडे बघावं. उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार कोणी नाही. राज ठाकरे साहेबांबत आम्हाला आदर आहे. पण एकनाथ शिंदे साहेबांवर बोलल्यावर आमच्याकडे काही पर्याय राहत नाही असे निलेश राणे म्हणाले.

Continues below advertisement

2019 ला झालेली सर्वात मोठी लाचारी होती 

राज ठाकरेंनी भावाकडे लक्ष द्यावे, नमो पर्यटन केंद्राबाबत तुम्हाला काय आक्षेप असेल तर सरकारकडे मांडा. महाराजांच्या नावावर राजकारण करु नये असे मत निलेश राणे यांनी व्यक्त केले. लाचारीची गोष्ट ठाकरेंनी करु नये,  2019 ला झालेली सर्वात मोठी लाचारी होती अशी टीका निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 

युती झाली तर एकत्र नाही झाली तर आम्ही तयारीत आहोत

कोण विनायक राऊत? विनायक राऊत कोकणात जे घडू नये ते घडवण्याच्या मानसिकतेने येतात. त्यांना महत्व देत नाही. बाहेरच्या लुंग्या पुंग्यांनी आम्ही काय करावे ते सांगू नये. आम्ही आमचं बघून घेऊ तुम्ही तुमचं बघा तुम्हाला उमेदवार मिळतील का बघा? अशी टीका देखील निलेश राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर केली. उद्या भाजपा आणि आमचे प्रमुख नेते एकत्र मिटिंग करणार आहोत. राणे साहेबांना विचारल्याशिवाय आम्ही काही करणार नाही. युती झाली तर एकत्र नाही झाली तर आम्ही तयारीत आहोत असेही निलेश राणे म्हणाले. 

Continues below advertisement

राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कानमंत्र दिला होता. तसेच, निवडणूक आयोग आणि केंद्र व राज्य सरकावरही तोफ डागली होती. तर, मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी, चाटुगिरी कारावी, असे म्हणत एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं. राज्यातील मतदार यादीतील घोळ लक्षात आणून देत त्यांनी प्रेझेंटेशनही केलं. 1 तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, महाराष्ट्रात काय आग पेटलीय हे दिल्लीला कळलं पाहिजे. सर्वांनी मोर्चाला या, बॉसने सुट्टी दिली नाही तर बॉसला मारा. शनिवारपुरतं एक मत त्याच्या गालावर द्या. तुमचा बॉसही मतदारच आहे, त्यालाही मोर्चाला घेऊन या, असे राज ठाकरेंनी म्हटले. 

महत्वाच्या बातम्या:

रायगड, शिवनेरीवर नमो टूरिझम सेंटर उभारुन दाखवाच, उभं केलं की फोडणार, राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना पहिला इशारा