Nilesh Lanke on Maharashtra Police Bharti: अहमदनगर : राज्यात (Maharashtra News) सुरू असलेली पोलीस भरती (Police Bharati) प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अहमदनगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. पावसामुळे (Rain Updates) उमेदवारांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता, भरती प्रक्रिया (Recruitment Process) पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. 


अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी राज्यभर सुरू होत असलेली पोलीस भरती पुढे ढकलावी अशी मागणी केली आहे. सध्या राज्यभर जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. त्यातच पाऊस सुरू असल्यानं उमेदवारांचा सराव देखील झालेला नाही. त्यामुळे ही भरती पुढे ढकलावी, अशी मागणी निलेश लंके यांनी केली आहे. 


राज्यात उद्यापासून पोलीस भरती


राज्यात उद्यापासून म्हणजेच, 19 जून 2024 पासून राज्यभरात पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पोलीस भरतीसाठी 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अर्जदारांमध्ये 40 टक्के उमेदवार उच्चशिक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस शिपाई पदांसाठी उद्यापासून अहमदनगरमध्ये मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. 


अहमदनगरमध्ये पोलीस शिपाई पदांसाठी मैदाना चाचणी 


अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई, बँड पथक आणि चालक पदासाठी उद्या (19 जून) पहाटे पाच वाजल्यापासून पोलीस मुख्यालयातील मैदानावर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा पोलीस दलातील शिपाई 25, तर चालकाच्या 39 जागा रिक्त आहेत. यातील पोलीस शिपाई पदासाठीच्या 25 जागांपैकी तीन जागा बैंड पथकासाठी राखीव आहेत. या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. 


शिपाई आणि बँड्समन पदासाठी 1947 ऑनलाइन अर्ज प्राप्त झालेले आहेत. चालक पोलिस शिपाई पदासाठी 3 हजार 909 अर्ज प्राप्त झालेले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसामुळे काही व्यत्यय आल्यास उमेदवारांना नंतरची तारीख कळविण्यात येईल. याशिवाय एकाच उमेदवाराला एकाच दिवशी दोन ठिकाणी मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याच्या सूचना प्राप्त झाल्या असतील, अशा उमेदवारांना दुसरी तारीख देण्यात येईल. परंतु, उमेदवारांनी याबाबत अर्ज करावा लागेल असं पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले आहे.


पाहा व्हिडीओ : Nilesh Lanke On Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलावी, खासदार निलेश लंकेंची मागणी



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


मोठी बातमी! राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती; 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख अर्ज, 40 टक्के उमेदवार उच्चशिक्षित