Maharashtra: देश विघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशयातून महाराष्ट्रात NIA आणि ATS ने मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. छत्रपती संभाजी नगर जालना आणि मालेगाव मधून काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले असून देश विघातक कृत्यांमध्ये या तरुणांचा संबंध असल्याचा संशय आहे. देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी ही कारवाई सुरू असून प्राथमिक माहितीनुसार जम्मू-काश्मीरमधील काही संघटनांचा यात समावेश आहे. पहाटेपासूनच महाराष्ट्रातील तीन ठिकाणी एनआयए आणि एटीएसच्या पथकाने छापेमारी करत काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. एनआयए आणि एटीएसने महाराष्ट्रात संयुक्त कारवाई केली आहे.


जालना छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतले ताब्यात 


महाराष्ट्रात NIA- ATS मे संयुक्त कारवाई करत जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दहशतवादी कृत्यात या तिघांचा समावेश असल्याचा संशय असल्याने ही कारवाई करण्यात आली. तरुणांना ताब्यात घेतलेल्या तीनही घटनास्थळी पंचनामा सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. 


छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा आझाद चौक जवळील भागातून ती कारवाई करण्यात आली असून जालना व मालेगाव मधूनही तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. शनिवारी पहाटे एनआयएकडून देशविघातक कार्य करणाऱ्या तरुणांवर देशभर कारवाईची मोहीम उघडण्यात आलेली आहे. यापूर्वीदेखील महाराष्ट्रातील संभाजी नगर, जालना आणि मालेगाव येथे एनआयएने छापेमारी केलेली होती.


देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशय 


देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी म्हणजेच एटीआय आणि दहशतवाद विरोधी पथक यांची संयुक्त कारवाई सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार जम्मू आणि काश्मीरमधील काही दहशतवादी संघटनांची याचा संबंध असल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातही दोन जिल्ह्यांमधून तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशातील पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने माओवाद्यांना शस्त्रे आणि स्फोटके पुरवल्याचा तपास सुरू केला असून महाराष्ट्रातही कारवाई करताना तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पहाटेपासूनच महाराष्ट्रातील तीन ठिकाणी एनआयए आणि एटीएसच्या पथकाने छापेमारी करत काही तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. एनआयए आणि एटीएसने महाराष्ट्रात संयुक्त कारवाई केली आहे.