New Year Celebration : आजपासून नवीन वर्षाला (New Year) सुरुवात झाली आहे. सर्वजण नवीन वर्षाचं जल्लोषाच स्वागत करत आहेत. नवीन वर्षानिमित्त राज्यातील प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी गेली आहे. देवदर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात करण्याला नागरिकांनी पसंती दिली आहे. देवस्थानच्या ठिकाणी लाखो लोकांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळालं. आज पहाटेपासूनचं दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. राज्यातील पंढरपूर (Pandharpur), शिर्डी (Shirdi), अक्कलकोट (Akkalkot), दगडूशेठ हलवाई मंदिर पुणे, सिद्धिविनायक मंदिर मुंबई, जेजुरीचे खंडेरायाचे मंदिर या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.


नवीन वर्षाचं स्वागत विठ्ठल दर्शनाने, मंदिरात आकर्षक सजावट


नवीन वर्षानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले आहेत. नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनाने होत आहे. दरम्यान, विठ्ठल मंदिरात आकर्षक अशी फळे आणि फुलांच्या सजावटीनं करण्यात आली आहे. नवीन वर्षासाठी विठ्ठल मंदिर प्रशासनानं मंदिराच्या वेळेत कोणताही बदल केला नाही.  चौखांबी, सोलाखांबी, रुक्मिणी चौखांबी इथं सिझनची फुले आणि फळांनी मनमोहक सजावट केली आहे. आळंदी येथील भाविक प्रदीप ठाकूर यांनी फुलांची सजावट केली आहे. यात सफरचंद, डाळिंब, बोरे, मोसंबीसह विविध फळांचा वापर करण्यात आला आहे. झेंडू, गुलाब, आर्चेड, गुलछडी, मोगरा, शेवंती आशा फुलांच्या रंगसंगतीचा वापर या सजावटीत करण्यात आला आहे.


खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीत भाविकांची गर्दी 


नववर्षाच्या पूर्वसंध्येला जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी जेजुरी नगरीमध्ये मोठी गर्दी केली आहे. इतर मंदिरही भाविकांसाठी 24 तास दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. जेजुरीचे मंदिर हे रात्री दर्शनासाठी बंद राहणार आहे. जेजुरी गडावर भाविकांची गर्दी झाली असून भंडाऱ्याची उधळण करीत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत भाविक दर्शन घेत आहेत.


शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात भाविकांची मोठी गर्दी 


संत गजानन महाराज मंदिरात सरत्या वर्षाला निरोप देऊन आज नववर्षाची पहाट अगदी प्रसन्न वातावरणात उजाडली आहे. मंदिर परिसरसतील झाडांवरच्या पक्षांच्या किलबिलाटाने, त्यानंतर मंदिरातील सनई चौघड्याच्या मंगल सुरांनी नवीन वर्षाची पहाट उजाडली. नवीन वर्षाच स्वागत राज्यभरातून आलेले हजारो भाविक संत गजाननाच्या दर्शनाने करत आहेत. रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुल होते. आज सकाळी पहिली पहाट असल्याने हजारो भाविक हे नवीन वर्षाची सुरुवात देव दर्शनाने करत असल्याचं चित्र आहे. राज्यभरातूनच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानातील भाविकसुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी आले आहेत. 


नवीन वर्षाचं स्वागत साईदर्शनाने


साईबाबाच्या दर्शनानं नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं. मध्यरात्री बारा वाजताच साईभक्तांनी एकच जल्लोष केला. साई नामाच्या जयघोषानं नवीन वर्षाचे स्वागत केलं. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साई दरबारी हजेरी लावली.


पुण्याच्या दगडूशेठ हलवाई मंदिरात भाविकांची मोठी गर्दी


दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी दगडूशेठ मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली. जवळपास दोन किमीपर्यंत दर्शनाच्या रांग लागल्या आहेत. नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी पुणेकर गणपती बाप्पा चरणी आले आहेत. गणपती बाप्पाची मुर्तीला आकर्षक साज चढवण्यात आला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik Saptshrungi Gad : सप्तशृंगी देवी दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी, मंदिर आज दिवसभर खुले राहणार