सोलापूर : ऊस दर आंदोलन सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आता चिघळू लागले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंढरपूर-सोलापूर मार्गावरील तुंगत येथे रास्ता रोको करत दोन तास वाहतूक अडवून धरली.
सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यातच अजून साखर कारखानदारांनी ऊसाचे दर जाहीर न करता गाळप सुरु केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण आहे. सोलापुरात ठिकठिकाणी स्वाभिमानी आणि इतर शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करीत असताना सरकार आणि कारखानदार याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आता शेतकरी संघटना आक्रमक होऊ लागल्या आहेत.
तुंगत येथे आज केलेल्या रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी हस्तक्षेत केल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र या आंदोलनामुळे सोलापूर रोडची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.
ऊसदरासाठी सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यात ‘स्वाभिमानी’चं आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Nov 2017 02:56 PM (IST)
सहकार मंत्र्यांच्या जिल्ह्यातच अजून साखर कारखानदारांनी ऊसाचे दर जाहीर न करता गाळप सुरु केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -