मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात फाईलींच्या सह्यावरून मोठा वाद झाल्याची माहिती आहे. नगरविकास खात्याची फाईल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतली. त्यावर तुमच्याकडून आलेल्या फाईलींवर मीही सह्या करणार नाही असं मुख्यमंत्री (Eknath Shinde) म्हणाले. त्यावर आज महाविकास आघाडीच्या बैठकीत बोलताना जयंत पाटलां (Jayant Patil) अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. आत्तापर्यंत न वाचता सह्या झाल्या का असा सवाल करत हल्लाबोल केला आहेत
अजित पवारांचा स्वभाव असा नव्हता पण...
लोकसभेत मुंबईत एक जागा चोरली, राज्यातील ३१ जागांवर भाजपला जनतेनं नाकारलं आहे. त्यामुळे ते या निवडणुकीला घाबरले आहेत आणि घाबरलेला माणूस काहीही करू शकतो. त्यामुळे ते आता कोणतेही घोषणा ते करत आहे. इतक्या घोषणा सुरू आहेत. असातच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सांगितलं मी फाईल वाचल्याशिवाय सही करणार नाही. मग याचा अर्थ आधी न वाचता सह्या झाल्या. त्यांचा स्वभाव असा नव्हता. पण परिस्थितीमुळे अशा गोष्टी होत असतात. असा टोला जयंत पाटलांनी यावेळी बोलताना अजित पवारांना (Ajit Pawar) लगावला आहे.
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील अनेक पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील महाविकास आघाडीची बैठक पार पडली आहे. यावेळी महाविकास आघाडीचे बडे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यात निवडणुका घेण्यासाठी हे सरकार घाबरत आहे, ते दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका घेतील असा अंदाज जयंत पाटलांनी व्यक्त केला आहे.
या ऑक्टोबरमध्ये निवडणुका हे सरकार घेणार नाहीत. तर दिवाळीनंतर हे सरकार निवडणुका घेईल असा अंदाज जयंत पाटलांनी व्यक्त केला आहे.एकमेकांना सहाय्य करून लढू, महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणू, तर या निवडणुकीत एकत्रित लढू, आणि जिंकू असा विश्वासही यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभेत ४०० पारचा नारा केला, पण ते २४० जागांवर थांबले
लोकसभेत ४०० पारचा नारा केला, पण ते २४० जागांवर थांबले. त्यांना बिहार आणि आंध्र प्रदेशाचा टेकू मिळाले. परंतु ते पलटी मारु लोक आहेत. हे सरकार कधी खाली येईल, त्याचे काही नेम नाही. फक्त आता सहा वर्ष की एक वर्ष हे बाकी आहे असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.