मुंबई लाडकी बहीण योजनेवरून सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यंमध्ये चांगलीच जुंपली आहे. लोकसभेच्या निकालानंतर महायुती घाबरली असून चांगली योजना आणण्यासाठी मध्य प्रदेशमधील योजना कॉपी केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार  रोहित पवारांनी केलीय.  दरम्यान यावरूनमहसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना धास्ती भरल्याचा पलटवार विखे पाटीली यांनी केला. 


रोहित पवार म्हणाले,  लोकसभेचा निकाल पाहिल्यानंतर महायुती घाबरली आणि स्वतःचे एखादी चांगली  योजना आणण्याऐवजी मध्य प्रदेश मधील योजना जशीच्या तशी कॉपी करत लाडकी बहीण योजना सरकारने आणली मनात रोहित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.  महाराष्ट्र राज्य हे संपूर्ण देशाला दिशा देतं मात्र आता सरकारनं आपल्या राज्यात कॉपी-पेस्ट सुरू केलं त्यातही या योजनेचा लाभ घेताना महिलांना अनेक अडचण येतात. आम्ही या योजनेवर टीका करत नाही तर सरकारवर टीका करतो.


सरकार तीन महिने पैसे देतील आणि नंतर योजना बंद करतील : रोहित पवार 


राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या सरकारने आणल्याने विरोधकांना भीती बसले आहे असं म्हटलं होतं त्यावर बोलताना रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा निधी कुठून येणार याची तरतूद न करता तुम्ही केवळ योजना जाहीर करता.  योजना जाहीर केली तर ती पूर्णत्वास नेली पाहिजे हे सरकार तीन महिने पैसे देतील आणि नंतर योजना बंद करतील असेही रोहित पवार म्हणाले. मात्र महाविकास आघाडी सरकार आलं तर ही योजना मी बंद करणार नाही, उलट ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असंही रोहित पवार म्हणाले.


तिघांमध्ये फक्त थांबवा थांबवी सुरू : रोहित पवार


सरकारमधील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये आधीपासूनच पटत नाही असा दावा करत रोहित पवार यांनी जोरदार टीका केली. राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहे दोघांचंही पद सारखे आहे मात्र तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रत्येक फाईल गेली , तर ती आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाते.  म्हणजेच अजित पवार यांच्या वर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस आहेत असं रोहित पवार म्हणाले.तर अजित पवार हे अर्थमंत्री आहेत त्यांच्याकडे देखील एखादी फाईल आली तर ते ती फाईल दाबतात , मुख्यमंत्री देखील त्यांच्याकडे आलेल्या फायली थांबवतात त्यामुळे या तिघांमध्ये फक्त थांबवा थांबवी सुरू आहे,  असं म्हणत रोहित पवार यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. 


हे ही वाचा :


तुमच्या खात्यात अजून 3000 रुपये आले नाहीत? आता काय करावं? 'या' तीन गोष्टी समजून घ्या