चंद्रकांत पाटील म्हणाले की, ''मी मीडियाला काही बोलणार नाही. पण रावसाहेब दानवे यांच्या वाक्तव्याचा विपर्यास केला गेला. वास्तविक, दानवे शेतकरी असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते सातत्यानं भांडतात.''
दानवेंच्या वक्तव्याने शेतकरी नाराज नसल्याचं सांगून, भाजपच्या संवादयात्रेचं नेतृत्वही तेच करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच विरोधकांनी दानवेंच्या राजीनाम्याची मागणी केली तरी ते त्यांचे काम असल्याचा टोला यावेळी पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रावादीला लगावला.
विशेष म्हणजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आत्मक्लेश यात्रेवरुन राजू शेट्टींना चिमटा काढला. ''स्वाभिमानी शेतकरी संघटना आत्मक्लेश यात्रा काढत असलीस, तरी त्यांना पक्ष वाढवण्याचे आणि बोलण्याचे स्वतंत्र आहे. हिच खरी लोकशाही आहे, त्यामुळं आम्ही त्यांना गप्प बसा म्हणणार नाही.''
तूर खरेदीवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी वादग्रस्त वक्तव्यं केलं होतं. जालन्यातील भाजप कार्यक्रमात बोलताना, ''राज्य सरकारने एवढी तूर खरेदी केली, तरी रडतात XXX,'' असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यातील शेतकऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली होती.
दुसरीकडे विरोधी पक्षांसह शिवसेनेनंही दानवेंविरोधात आंदोलन सुरु केलं होतं. तर शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष यांनी दानवेंची जीभ छाटून आणणाऱ्यास पाच लाखाच्या बक्षीसाची घोषणा केली होती.
काल उस्मानाबादमध्ये मुख्यमंत्र्यांना दानवेच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता, त्यांनी प्रश्नाला बगल देत बोलण्यास नकार दिला.
संबंधित बातम्या