Ajit Pawar on Eknath Shinde : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारवर टीका करत 'मंत्रिमंडळ विस्तार न होण हा जनतेचा अपमान', अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच जर सरकारकडे बहुमत आहे तर सिद्ध करा, असंही ते म्हणाले. याशिवाय 25 जुलै उजाडल्यानंतरही पावसाळी अधिवेशन अद्याप झालं नसल्याने यावरही पवारांनी टीका करत सरकारला जाब विचारला आहे. तसंत मुख्यमंत्र्यांवर टीका करताना 'मुख्यमंत्री दिल्लीला जातात, पण जनतेचं काय? 'एकनाथ शिंदे यांनी आमच्यासोबत काम केलं तेच आता कामांना स्थगिती देतं आहेत. ते दोघे काय सत्तेचा ताम्रपट घेउन आले आहेत का?' असा सवालही पवारांनी विचारला आहे. 


अधिवेशन तारखा सातत्यानं पुढे जात आहे. हे सरकार जर बहुमत आहे तर मग अधिवेशन का घेत नाही. विधीमंडळात आमदारांना आपले प्रश्न मांडता येतात परंतु जाणीवपूर्वक अजूनही मंत्रिमंडळ विस्तार आणि अधिवेशन घेतलं जात नाही. असं अजित पवार म्हणाले आहेत.  


 


ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज 


विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल ओला दुष्काळ जाहीर कऱण्याची मागणी केली आहे. त्यांनी लिहिलेल्या पत्रात जून महिन्याच्या जवळपास 20 तारखेपासून ते आजपर्यंत सातत्याने पाऊस पडत आहे. राज्यातील काही भागांमध्ये मी स्वत: पाहणी केली असून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांच्याशी सातत्याने दूरध्वनीद्वारे संपर्कात आहे.  या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांने केलेल्या पेरण्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पावसाने जमिनी वाहून गेल्या असून घराचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. स्थावर मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पंचनामे अजुनपर्यंत होऊ शकले नाहीत. पूर्वीच या दोन्ही विभागामध्ये शेतकरी अडचणीत असताना मोठया प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होण्याचे प्रमाण निदर्शनास आले आहे. यावर तातडीने त्यांना एक दिलासा म्हणून त्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टींने आणि आत्महत्या होऊ नये याकरिता या दोन्ही विभागांमध्ये आणि राज्याच्या इतर विभागामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची नितांत आवश्यकता आहे असे म्हटले आहे.


हे देखील वाचा -