Ajit Pawar : एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला संधी मिळालेली नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तळ ठोकूनही पदरी निराशा आली आहे. महाराष्ट्रातून सहा जणांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे. महाराष्ट्रातून भाजपकडून नितीन गडकरी, पियूष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे यांना फोन गेला आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव यांना संधी देण्यात आली आहे. आरपीआयकडून रामदास आठवले पुन्हा मंत्री असतील. त्यामुळे महाराष्ट्रातून एनडीए सरकारमध्ये सहा जणांना मंत्रिपदासाठी फोन गेला आहे.






महाराष्ट्रातून मोदी मंत्रीमंडळात कोण कोण?



  • नितीन गडकरी, भाजप, विदर्भ 

  • पियुष गोयल, भाजप, मुंबई

  • रक्षा खडसे, भाजप, उत्तर महाराष्ट्र

  • मुरलीधर मोहोळ, भाजप, पश्चिम महाराष्ट्र

  • रामदास आठवले, आरपीआय

  • प्रतापराव जाधव, शिवसेना, विदर्भ


सहा मंत्रिपदात प्रादेशिक समतोल कसा साधला?


दुसरीकडे, नारायण राणे यांना मंत्रिपदासाठी अजूनही फोन आलेला नाही. दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे. राज्याचा प्रादेशिक समतोल पाहिल्यास मुंबईतून पियूष गोयल यांना संधी देण्यात आली आहे. विदर्भातून नितीन गडकरी आणि प्रतापराव जाधव असतील. पश्चिम महाराष्ट्रातून मुरलीधर मोहोळ असतील. उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे यांना संधी देण्यात आली आहे.  




दरम्यान, शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदी पंतप्रधान निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची भेट घेत आहेत. या बैठकीत सहभागी होण्यासाठी संभाव्य मंत्र्यांसह भाजपचे नेते पोहोचू लागले आहेत. अमित शाह, जेपी नड्डा, बीएल वर्मा, पंकज चौधरी, शिवराज सिंह चौहान, किरण रिजिजू, जितीन प्रसाद, रवनीत सिंह बिट्टू, अन्नपूर्णा देवी, अर्जुन राम मेघवाल, नित्यानंद राय, अर्जुन मेघवाल असे भाजप नेते पोहोचले आहेत. आरजेडी नेते लल्लन सिंह, रामनाथ ठाकूर, लोजप नेते चिराग पासवान हेही पोहोचले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या