Rohit Pawar : भाजप (BJP) सरकार जातीवादी पक्ष आहे. त्यांच्यामुळे राज्यात अशांतता निर्माण होत असते. असे असताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे ज्येष्ठ नेते आहेत. भाजप (BJP) सारख्या पक्षाला हरवण्यासाठी त्यांनी एकत्रित आल पाहिजे. असे आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले आहे.


प्रकाश आंबेडकरांना रोहित पवारांची साद 


नुकतीच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि भाजपच्या नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची भेट झालीय. लातूरहून बीडकडे येत असताना प्रकाश आंबेडकर यांची पंकजा मुंडे यांनी भेट घेतलीय. सध्या प्रकाश आंबडेकर यांची आरक्षण बचाव यात्रा सुरु आहे. ही यात्रा लातूरवरून आज बीडमध्ये दाखल होत आहे. त्यादरम्यान पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत त्यांचं स्वागत केलं. पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आले असताना रोहित पवारांनी प्रकाश आंबेडकरांना सोबत येण्याचं आवाहन केलं आहे. 


.....तर लोकसभेत आणखीन चांगला निकाल लागला असता


शरद पवार हे आरक्षणाचा विषयी बोलताना  त्यांनी नामांतराचा विषयात हात घालून आगीत तेल टाकत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. याबाबत रोहित पवार यांना विचारलं असता त्यांनी स्पष्ट केलं की, प्रकाश आंबेडकर ज्येष्ठ नेते आहेत. भाजप सारख्या पक्षाला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं. ते जर आमच्यासोबत  राहिले असते तर लोकसभेत आणखीन चांगला निकाल लागला असता. परिणामी त्यांनी आमच्याबरोबर यावं. असे आवाहन रोहित पवारांनी प्रकाश आंबेडकरांना केलं आहे.


दोषींवर योग्य ती कारवाई करावी  


पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की,  मास्क आणि टोपी घालून विमान प्रवास केलेला व्यक्ती नेमका कोण? त्याची माहिती काढण्यात यावी. देशाच्या सुरक्षिततेचा हा प्रश्न आहे. तसेच या प्रकरणी कुणी दोषी आढळल्यास दोषींवर योग्य ती कारवाई करावी, असे मत ही रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या कथित विमान प्रवासाबद्दल व्यक्त केले आहे. रोहित पवार हे आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. लातूर येथील कार्यक्रम संपल्यानंतर ते अहमदपूरकडे रवाना झाले आहेत. त्यावेळी ते बोलत होते.


इतर महत्वाच्या बातम्या