Rohit Pawar on Nawab malik ED Inquiry : मंत्री नवाब मलिक यांनी अनेक कागदपत्रे दाखवली आहेत, कदाचित त्यामुळेच ईडीची कारवाई झाली असेल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले. आज उत्तर प्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यामध्ये भाजपचे मौर्यांसारखे मोठे नेते आहेत. त्यांचं ते कार्यक्षेत्र आहे. गेल्या अनेक टप्प्यात समाजवादी पार्टीला त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतोय. भाजपचे छोटे नेते भाजपला सहकार्य करत नाहीत असं दिसतंय. त्यामुळे महाराष्ट्रात एका मंत्र्याला नोटीस नसताना आम्ही ताब्यात घेऊ शकतो, असा संदेश कदाचीत भाजपला उत्तर प्रदेशच्या नेत्यांना द्यायचा असेल असे रोहित पवार म्हणाले. या निवडणुकीमध्ये आमचं ऐका नाहीतर, उत्तर प्रदेशमध्येसुध्दा आम्ही अशा प्रकारची कारवाई करु शकतो, असा संदेश भाजपला द्यायचा असेल असे रोहित पवारांनी सांगितले.
मलिक साहेबांनी महाराष्ट्रातील ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणलं आहे, भाजपचे काही पदाधिकारी उघडकीस आणले आहेत. इथं उघड झालेलं रॅकेट गुजरातपर्यंत जाईल असं वाटलं असेल, त्यामुळे कारवाई झाली असेल असे रोहित पवार म्हणाले. गुजरातमध्ये देखील 22 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचे ड्रग सापडले असेे पवार म्हमाले. आज संध्याकाळी मलिकसाहेब बाहेर आल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल असेही यावेळी रोहित पवारांनी सांगितले.
यूपीमध्ये ईडीचे सिंग नावाचे अधिकारी होते. मोठ्या केस बघत होते. त्यांना भाजपने तिकीट दिलं आहे. त्यामुळे सत्तेत असताना, पदावर असताना आम्ही सांगू ते करा, निवृत्तीनंतर आम्ही पुनर्वसन करु असा संदेश भाजपला द्यायचा आहे असे त्यांनी सांगितले. 10 मार्चनंतर उत्तर प्रदेशात नक्की बदल होईल, त्यांचे पडसाद केंद्रात उमटतील. यापूर्वी चंद्रकांत पाटील साहेबांनी अनेकवेळा आकाशवाणी केली आहे, तीन महिने म्हणता म्हणता तीन वर्षे महाविकास आघाडीची झाली असा टोला देखील रोहित पवार यांनी लगावला.
लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे. एखाद्या मंत्र्याला नोटीस न देता ताब्यात घेणं हे लोकशाहीसाठी घातक. काही दिवसांनी महापालिका निवडणूक लागणार आहेत. मलिकसाहेब मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष आहेत. त्यामुळे पक्षाची हानी करुन फायदा करुन घ्यायचा हा भाजपचा हेतू आहे. मलिकसाहेब संध्याकाळी आपली भूमिका मांडतील, असेही पवार म्हणाले. दरम्यान, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी कर्यालयात नेले आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले आहे. यावर विविध रजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या: