NCP MLA Jitendra Awhad Resignation Live Updates : जितेंद्र आव्हाडांवरील गुन्ह्यानंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादी आक्रमक, थेट गृहमंत्र्यांना इशारा 

NCP MLA Jitendra Awhad Resignation Live Updates : जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Nov 2022 05:36 PM
आव्हाड यांच्याविरोधातील विनयभंगाचे आरोप हा कटाचा एक भाग; अजित पवार यांचा आरोप

Jitendra Awhad: आव्हाड यांच्याविरोधातील विनयभंगाचे आरोप हा कटाचा एक भाग असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

Jitendra Awhad: विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली जितेंद्र आव्हाड यांची भेट

Jitendra Awhad: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली आमदार जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. 

जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याविरोधात जळगावमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आज जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. जितेंद्र आव्हाड यांच्यावर 72 तासांमध्ये दोन गुन्हे दाखल झाले असून सरकारची दडपशाही यातून दिसून येत आहे. यापुढे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले तर राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी दिला आहे. 


 

कोणतीही कारवाई राजकीय सुडापोटी केली जाणार नाही; आव्हाडांवरील कारवाईवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया 

मुंबई : जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला की नाही हे मला माहित नाही. परंतु, या प्रकरणात पोलिस नियमानुसार चौकशी करतील. संबंधित महिलेच्या तक्रारीत तथ्य असेल तर पोलिस आपले काम करतील. आम्ही कोणत्याही सुडापोटी कारवाई करत नाही, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. 

जितेंद्र आव्हाडांवरील गुन्ह्यानंतर नाशिकमध्ये राष्ट्रवादी आक्रमक, थेट गृहमंत्र्यांना इशारा 

नाशिक : माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. नाशिक मधील हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याचा निषेध केला. जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचं या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. तसेच जर या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली किंवा वेगळ्या प्रकारची कारवाई झाली तर कार्यकर्ते आक्रमक होतील. त्यानंतर पुढे जे काही होईल त्याला गृहमंत्री जबाबदार राहतील, असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिलाय. 

जितेंद्र आव्हाडांवरील गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध, ठिय्या आंदोलन

माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. नाशिक मधील हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत आव्हाड यांच्यावर दाखल विनयभंगाच्या गुन्ह्याचा निषेध केला. जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचं या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. तसेच जर या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली किंवा वेगळ्या प्रकारची जर कारवाई झाल्यास तर कार्यकर्ते आक्रमक होतील आणि या संपूर्ण घटनेला गृहमंत्री जबाबदार राहतील, असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला.

जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या महिलेविरोधात अॅट्रॉसिटीतचा गुन्हा दाखल

जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या महिलेविरोधात अॅट्रॉसिटीतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारांनी आरोप केलाय की, आव्हाडांविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेनं तक्रारदारांना मंदिरात जाण्यापासून रोखलं होतं. तसेच, जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप केला आहे. 

Jitendra Awhad Resignation of MLA : जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, कार्यकर्त्यांचा मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या

Jitendra Awhad Resignation of MLA : कळवा-मुंब्रा पुल उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आणि हा खोटा गुन्हा असल्याचं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देण्यासंदर्भात ट्विट केलं. या घटनेचे आता चांगलेच पडसाद उमटू लागले आहेत. महाविकास आघाडीच्या महिला खासदार आणि आमदारांचं शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेत, आव्हाडांविरोधातील कारवाईचा निषेध केलाय. तर दुसरीकडे आव्हाड समर्थक कार्यकर्त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलंय. जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा देऊ नये असं आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलंय. 

Jitendra Awhad Resignation of MLA : जितेंद्र आव्हाडांवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ समर्थक आक्रमक

Jitendra Awhad Resignation of MLA : जितेंद्र आव्हाडांवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या निषेधार्थ समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. मुंब्र्यातील दुकानं बंद करण्यास सुरुवात झाली आहे. तसंच सकाळी रिक्षा देखील बंद करण्यात आल्या होत्या. सकाळी मुंब्रा बायपासवर टायरची जाळपोळ करण्यात आली. तर रात्रीपासून मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरु आहे.

Jitendra Awhad: ...तर रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होतात; जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया

Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले असताना दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड यांनी कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तक्रारदार महिलेविरोधात गुन्हे दाखल असून त्या जामिनावर असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. आव्हाडांविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचा विशिष्ट हेतू  असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Jitendra Awhad: ...तर रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होतात; जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया

Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले असताना दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड यांनी कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तक्रारदार महिलेविरोधात गुन्हे दाखल असून त्या जामिनावर असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. आव्हाडांविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचा विशिष्ट हेतू  असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जितेंद्र आव्हाडांवरील विनयभंगाचा आरोप चुकीचा, हेतुपुरस्सर आरोप केले जातायत : अंजली दमानिया

Anjali Damania on Jitendra Awhad Resignation of MLA : जितेंद्र आव्हाडांवरील (Jitendra Awhad) विनयभंगाचा आरोप चुकीचा असल्याचं मत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी व्यक्त केलं आहे. विनयभंग? काय वाट्टेल ते आरोप? असं म्हणत अंजली दमानिया यांनी ट्वीटही केलं आहे. तसेच, जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मी खूप लढलेय, पण त्यांच्यावरचा हा आरोप अतिशय चुकीचा, असल्याचंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

FIR Against Jitendra Awhad : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मविआ नेते आणि कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हा दाखल करण्याचा धडाका : चंद्रकांत खैरे

FIR Against Jitendra Awhad : महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा धडाका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुरु केला आहे. यामुळे महाविकास आघाडी आणखी मजबूत होणार असून पोलिसांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव येत आहे, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

Jitendra Awhad : 'या' घटनेनंतर महिलेची जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाची तक्रार

Jitendra Awhad : 'या' घटनेनंतर महिलेची जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाची तक्रार 


FIR against Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड समर्थकांचा मुंब्रा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या

FIR against Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे आव्हाड समर्थक आक्रमक झाले आहेत. समर्थकांनी सुरुवातीला रस्त्यावर ठिय्या मांडल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तसंच कामावर निघालेल्या नोकरदारांची मोठी गैरसोय होऊ लागली. यानंतर पोलिसांनी समर्थकांची समजूत काढली. त्यानंतर समर्थकांनी आता मुंब्रा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. 

पुरुषांना न्याय मिळण्यासाठी राज्य पुरुष आयोगाची स्थापना करावी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षांची मागणी

FIR against Jitendra Awhad : महिलांच्या आडोशाने गुन्हा दाखल होण्याचे प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महिला आयोगाप्रमाणेच पुरुषांना न्याय मिळण्यासाठी राज्य पुरुष आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी केली आहे.

Jitendra Awhad: मुंब्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आंदोलन

Jitendra Awhad: मुंब्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. कार्यकर्त्यांनाा रस्त्याच्या एका बाजूला नेण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे. 


 

जितेंद्र आव्हाड यांची इमेज खराब करण्याचा प्रयत्न, राजीनामा देऊ नये अशी विनंती आव्हाडांना करणार : जयंत पाटील

Jayant Patil Reaction on Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्यावर असे आरोप करुन आणि गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन त्यांची इमेज खराब करण्याचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्रात अशी पद्धत नव्हती. जितेंद्र आव्हाडांना टार्गेट केलं जात आहे. सरकार किती खुनशी पद्धतीने काम करतंय हे दिसतं. मी आव्हाडांना राजीनामा देऊ नये अशी विनंती करणार आहे. त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मर्यादा सोडून राग व्यक्त करण्याची नवी पद्धत महाराष्ट्रात दिसायला लागली आहे. 

Jitendra Awhad : तक्रारदार महिलेनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर गुन्हा दाखल; जितेंद्र आव्हाडांचा दावा

तक्रारदार महिलेनं मुख्यमंत्र्यांची (CM Eknath Shinde) भेट घेतल्यानंतर गुन्हा दाखल केला असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी केला आहे. क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातमी...

पार्श्वभूमी

Jitendra Awhad Resignation of MLA : तक्रारदार महिलेनं मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर गुन्हा दाखल केला असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी केला आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत असल्याचं ट्वीट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अशातच पोलिसांनी 72 तासांत माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही या ट्वीटमधून जितेंद्र आव्हाड  यांनी केला आहे. 


महाविकास आघाडीच्या सरकारमधले गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत एक मोठा बॉम्ब फोडला आहे. आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केलं आहे. पोलिसांनी 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केलं आहे. हर हर महादेव सिनेमावरुन विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. तर काल कळवा-मुंब्रा नवीन पुल उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान महिलेनं विनयभंगाचा आरोप केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला.  हे दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं ट्वीट केलं आहे.  


मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय, असं ट्वीट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलं आहे. पोलिसांनी 72 तासांत माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही या ट्वीटमधून जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी केला आहे. तसेच, लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 


राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं आहे की, "पोलीसांनी माझ्या विरुद्ध 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले आणि तेही 354. मी या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. लोकशाहीची हत्या.. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत." 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.