NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादीचे दादा अजित पवारच, राहुल नार्वेकर यांचा निर्णय

NCP Sharad Pawar and Ajit Pawar Live Updates : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवार यांचाच आहे, हे आकड्यावरुन सिद्ध होतंय असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Feb 2024 06:27 PM
Sunil Tatkare on NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया 


दोन गटांतील हा पक्षांतर्गत वाद, त्यामुळे सगळेच पात्र

अजित पवार आणि शरद पवार या दोन गटांतील हा पक्षांतर्गत वाद आहे. त्यामुळे कुणीही पक्ष सोडलेला नाही. परिणामी दहाव्या सूचीनुसार कोणावर अपात्रतेची कारवाई करता येत नाही - राहुल नार्वेकर 

शरद पवार गटाने दहाव्या सूचीचा गैरवापर करु नये,

आमदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न शरद पवार गटाने करु नये. शरद पवार गटाने दहाव्या सूचीचा गैरवापर करु नये, असे राहुल नार्वेकर म्हणाले. 


शरद पवार गटाच्या तिन्ही याचिका राहुल नार्वेकर यांनी फेटाळल्या. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच आहे, त्यांचे आमदारही सुरक्षित आहेत. 

पक्षातंर्गत वादपक्षानं आपापसात मिटवायला हवेत

विधानसभा अध्यक्षांचा खरंतर या सर्व घटनांशी काहीही संबंध नसतो. तो कायद्याचा पालक असतो. पक्षातंर्गत वाद हे त्या त्या पक्षानं आपापसात मिटवायला हवेत - नार्वेकर

अजित पवार गटानं बंडखोरी केली नाही

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटानं बंडखोरी केली किंवा पक्ष नेतृत्त्वाविरोधात काम केलं असं म्हणता येणार नाही - नार्वेकर

दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही - नार्वेकर

नवनवीन पक्षांसोबत व विचारसरणीसोबत हल्ली युती व आघाडी होताना आपण पाहत आहोत. पण त्याचा अर्थ प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही. अजित पवार व शरद पवार या दोन गटांतील हा पक्षांतर्गत वाद आहे. त्यामुळे कुणाही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही, असे राहुल नार्वेकर म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा हे ठरवताना विधिमंडळ बहुमाताचा विचार करावा लागला. 53 पैकी 41 आमदार अजित पवार यांच्याकडे आहे. हे बहुमत शरद पवार गटाने नाकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचीच आहे. 

अध्यक्षपदाची निवड घटनेला धरुन नाही

अध्यक्षपदाची निवड घटनेला धरुन नाही, असा दावा दोन्ही गटाकडून कऱण्यात आला. 29 जून 2023 पर्यंत शरद पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान नव्हतं. पण 30 जून 2023 रोजी दोन जणांकडून अध्यक्ष असल्याचा दावा

दोन्ही गटांकडून समांतर दावे करण्यात आले

आपला अध्यक्ष कसा योग्य हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पुरावे दिले. दोन्ही गटांकडून समांतर दावे करण्यात आले. प्रतिनिधिंच्या निवडणुकीचे पुरावे शरद पवार गटाकडून सादर करण्यात आले नाहीत. पक्षाचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही.

शिवसेनेच्या निकालाचा दाखला दिला

शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय कार्यकारणी हीच सार्वभौम

मी माझे मत मांडण्यास सुरुवात करत आहे. या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. मात्र तो गट तयार झालेले आहेत. प्राथमिक स्तरावर मी पक्षीय रचना, घटना व विधीमंडळ बळ या त्रिसूत्री वर मत नोंदवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारणी हीच सार्वभौम आहे. 

पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचं

राष्ट्रवादी काँग्रेसची घटना सर्वात महत्त्वाची आहे. दोन्ही गट त्याला बांधिल आहेत. 30 जून 2023 ला या पक्षात फूट पडली. अश्यावेळी नेतृत्त्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचं आहे. 

कार्यकराणी समितीच सर्वात मोठी  

राष्ट्रवादी काँग्रेसच्या  सर्व समित्यांची बाजूही समजून घेतल्या.


कार्यकारणी आणि अध्यक्षांचे अधिकार लक्षात घेतले. 


कार्यकराणी समितीच सर्वात मोठी  


दोन्ही गटांना म्हणणं मांडण्याची संधी दिली. 


30 जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. 


नेतृत्व रचनेसाठी पक्षघटना लक्षात घेतली.

नेतृत्व रचनेसाठी पक्षघटना लक्षात घेतली.

30 जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. 


नेतृत्व रचनेसाठी पक्षघटना लक्षात घेतली.

Maharashtra Politics : निकाल देताना तीन गोष्टींचा विचार

NCP MLA Disqualification Case Live Updates  दोन्ही गटाने आम्ही मूळ पक्ष असा दावा केला. पण निकाल देताना मूळ पक्ष कुणाचा हे पाहणं महत्वाचं आहे. पक्षघटना, नेतृत्व रचना आणि विधिमंडळ बहुमताचा विचार केला, असे नार्वेकर म्हणाले. 

Maharashtra Politics : निर्णय देण्याआधी पक्ष कुणाचा हे ठरवणं महत्वाचं

NCP MLA Disqualification Case Live Updates : शिवसेनेची केस आणि कोर्टानं घालून दिलेले नियम पाहिले. 10 व्या सुचीनुसार कारवाई होऊ शकते का? हे पाहणं महत्वाचं आहे. निर्णय देण्याआधी पक्ष कुणाचा हे ठरवणं महत्वाचं आहे. - राहुल नार्वेकर

Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्ष थोड्याच वेळात राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकालाचे वाचन करणार

NCP MLA Disqualification Case Live Updates : पवार काका पुतण्यातील संघर्षाची परिणिती पक्षफुटीत होऊन 7 महिने उलटले आहेत. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीची सूत्रे अजितदादांच्या हाती दिल्यानंतर आता विधिमंडळात झालेल्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. थोड्याच वेळात विधानसभा अध्यक्ष या प्रकरणी निकाल देणार असून कुठल्या गटाचे आमदार अपात्र होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

NCP MLA Disqualification Case Live Updates : कोणाचे आमदार अपात्र, अजित पवारांचे की शरद पवारांचे?

Maharashtra Politics : राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल आज जाहीर होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दुपारी निकालाचं वाचन करतील. त्यामुळे कोणाचे आमदार अपात्र ठरणार अजित पवार गटाचे की शरद पवार गटाचे? विधानसभा अध्यक्ष नेमका काय निकाल देणार?, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Ulhas Bapat on NCP MLA Disqualification : विधानसभा अध्यक्षांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा कमीच : कायदेतज्ज्ञ उल्हास बापट

पुणे : विधानसभा अध्यक्ष म्हणजे पक्षाचा सदस्य, त्याच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा खूप कमी असते, असं कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. आज विधानसभा अध्यक्षाच्या निकाल वाचनाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे. राज्याच्या राजकारणात  (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून मोठ्या उलथापालथी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता आणखी पुढे काय-काय होणार याकडे सर्वसामान्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

Ajit Pawar : अजित पवारांच्या वक्तव्याने वाद रंगला

Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये बारामती लोकसभा जागेवरून रणकंदन सुरू आहे. या जागेवरून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उतरवणार असल्याची चर्चा रंगली आहे. बारामती मतदारसंघाचा दौरा अजित पवार यांनी करताना शरद पवार यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली होती.  या टीकेनंतर विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा पलटवार करताना काकांच्या मरणाची वाट पाहत आहेत, तुमच्यासोबत काम केल्याची लाज वाटत असल्याचा  घणाघाती हल्ला चालवला होता. यानंतर अजित पवार यांनी आपल्या वक्तव्याचा ध चा मा केल्याचा आरोप केला होता. 

Ajit Pawar : आता काकाका असे लिहून प्रचार केला पाहिजे

NCP Dispute : अजित पवार गटाच्या सोशल मीडिया मेळावा पार पडला. यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांनी शरद पवार यांना पाडलं पाहिजे, असा स्पष्ट कानमंत्र दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अजित पवार यांनी सांकेतिक शब्दांचा उलघडा केला. अजित पवार यांनी एक उदाहरण देत म्हणाले की, सका पाटलांचा प्रचार करताना 'पापापा' असं लिहून प्रचार करत होते. आता काकाका असे लिहून प्रचार केला पाहिजे. पापापा म्हणजेच पाटलाला पाडलं पाहिजे. त्यामुळे आता अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात दोन हात केल्याचे स्पष्ट झालं आहे. 

NCP Political Crisis : शरद पवार की अजित पवार कुणाचे आमदार अपात्र ठरणार?

NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांचं लक्ष निकालाकडे लागलं आहे. याशिवाय संपूर्ण राज्याचं लक्षंही विधानसभा अध्यक्षांच्या निकालाकडे लागलं आहे. 

NCP MLA Disqualification Case : आज विधानसभा अध्यक्ष काय निकाल देणार?

Maharashtra Politics : मुंबई : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा (NCP MLA Disqualification Case) निकाल आज (15 फेब्रुवारी 2024) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narwekar) यांच्याकडून दिला जाणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट (Ajit Pawar Group) आणि शरद पवार गट (Sharad Pawar Group) या दोन्ही गटांचं लक्ष निकालाकडे लागलं आहे. याशिवाय संपूर्ण राज्याचं (Maharashtra Politics) लक्षंही विधानसभा अध्यक्षांच्या निकालाकडे लागलं आहे. 


 

पार्श्वभूमी

Maharashtra Politics Live Updates : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी निकाल दिला. राहुल नार्वेकरांच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवार यांचाच आहे, हे आकड्यावरुन सिद्ध होतंय असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.