मुंबई : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र अध्यक्षा चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना अटक करण्यात आली आहे. किशोर वाघ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल 4 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
किशोर वाघ परळमधील महात्मा गांधी वैद्यकीय रूग्णालयात, वैद्यकीय अहवाल ग्रंथपाल आहेत. वाघ यांनी नुकसान भरपाईचा धनादेश देण्यासाठी 4 लाखांची लाच मागितली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे.
किशोर वाघ याच्यांसमवेत आणखी दोन जणांना एसीबीनं अटक केली आहे.