Sushma Andhare join Shiv sena : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या शिवसेनेतून आऊटगोईंग सुरु होतं. पण आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरु झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या, प्रवक्त्या सुषमा अंधारे गुरुवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुषमा अंधारे गुरुवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 


शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
हा प्रवेश मला काय देणार, असा अनेकांचा प्रश्न असेल. आता काय द्यायचं आणि काय घ्यायचं? हा मुद्दाच नाही. शिवसेनेकडून आता काही आपेक्षाही नाहीत. अजिबातच नाहीत. आता माझ्या डोक्यात फक्त एकच आहे की, मी शिवसेनेला काय देऊ शकते. मी काय करु शकते? चांद्यापासून बांद्यापर्यंत जो शिवसैनिक भरकटला आहे.  या शिवसैनिकांमध्ये मी कशी एक नवी उमेद जागी करु शकते, हे महत्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी दिली.  



कोण आहेत सुषमा अंधारे?


1) कोरेगाव भीमा प्रकरणात मिलींद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याबाबत फिर्याददार 


2) शाहू-फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या


3) गणराज्य संघच्या प्रमुख, या संघा मार्फत संविधानीक हक्कांबाबत जनजागृती करण्याचं काम


4) लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्या गणराज्य संघचा राष्ट्रवादीला पाठींबा दिला.


5) विधानसभा निवडणुकी नंतर विधान परिषदेवर संधी मिळण्याची आशा मात्र पक्षाकडून अमोल मिटकरी यांना पक्षाकडून विधान परिषदेवर संधी


6) राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी संधी मिळण्याची आशा मात्र त्यावेळी देखील संधी न मिळाल्यामुळे नाराजीचा सुर


7) मागील काही दिवसांपासून सचीन अहिर यांच्या माध्यमातुन शिवसेनेत प्रवेश करण्याबाबत चर्चा. अखेर उद्या 12 वाजता मातोश्रीवर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम