मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना पुन्हा एकदा धमकीचं पत्र मिळालं आहे. या पत्रात त्यांना जीवे मारण्याच्या धमकीसह कुटुंबातील महिलांवर बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचं पत्र लिहिणाऱ्याने स्वतःला नौदलात कर्नल असल्याचं सांगितलं आहे. मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप केल्याने आपण पत्र लिहीत असल्याचा उल्लेख देखील या पत्रात करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

"समीर वानखेडे यांची माफी मागितली नाही तर मलिक यांच्या घरावर हल्ला करणार असल्याचा इशारा या पत्रातून दिला गेला आहे. या संपूर्ण प्रकरणी आपण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पत्र लिहून या पत्राची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. हे पत्र अभिजित बनसोडे नावाच्या व्यक्तीने कफ परेड मुंबई येथून लिहिलं असल्याचं म्हटलं आहे.

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, "आपण अशा धमक्यांना घाबरत नाही. मागे देखील अशाप्रकारच्या धमक्या मला फोनवरून आल्या होत्या. परंतु यातील एकाही धमकीला आपण घाबरलेलो नाही आणि घाबरणार नाही."

Continues below advertisement

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात नवाब मलिक यांना एका निनावी फोन वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. राजस्थानमधून हा फोन आल्याचे मलिक यांनी म्हटले होते. समीर वानखेडे चांगले काम करत आहेत. त्यांच्या कामात अडथळा आणू नका. अशी धमकी मलिक यांना देण्यात आली होती. या धमकीनंतर मलिक यांनी पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली होती. 

बॉलिवूडमधून समोर आलेलं ड्रग्ज कनेक्शन आणि मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवर नवाब मलिक आरोप केला आहे. शिवाय गेल्या अनेक दिवसांपासून मलिक पत्रकार परिषद घेत एनसीबीवर गंभीर आरोप करत आहेत. त्यावरूनच त्यांना अशा धमक्या मिळत आहेत.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha 

महत्वाच्या बातम्या