Hasan Mushrif : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज थकबाकीच्या मुद्यावरून लिहिलेल्या पत्राची उलटसुलट चर्चा सुरू आहे. राज्यात वीज निर्मितीसाठी कोळसा टंचाई आहे. कोळसा खरेदीसाठी निधी नसल्याने मुख्यमंत्र्यांना नितीन राऊत यांनी पत्र लिहिले आहे. यावरून ग्राविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपवर टीका केली आहे. "भाजप युतीच्या काळात वीज बिलांची वसुली न केल्यामुळे 60 ते 65 हजार कोटींची थकबाकी आहे, अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केली आहे. 

हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर येथे माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, "कोळशाला पैसे नाहीत अशी व्यथा नितीन राऊत यांनी मंत्रिमंडळात मांडली आहे. पथकराची 400 ते 500 कोटी रुपये ग्राम विकास विभागाने भरले आहेत. त्याची पडताळणी सुरू असून बिलांमध्ये काही त्रुटी होत्या. पडताळणी झाल्यानंतर ग्रामीण विकास आणि नगर विकास विभाग बिल भरेल. महावितरण सुद्धा राज्याचा भाग आहे. राज्य अंधारात जाणं महाविकास आघाडीला परवडणार नाही. यावर नक्की काहीतरी मार्ग काढला जाईल".

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीवरून विरोधकांकडून सतत प्रश्न उपस्थीत केले जात आहेत, यावर बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, "दोन महिने मुख्यमंत्री आजारी होते. त्यांच्याबद्दल अफवा पसरवल्या गेल्या आहेत. परंतु, त्यांनी ज्या पद्धतीने राज्य चालवलं, त्यामुळे त्यांच्या बद्दल सहानुभूती आहे".

...तर अमोल कोल्हेंना माफ केलं नसतंराष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथूराम गोडसेची भूमिका साकारल्यामुळे त्यांच्यावर विविध क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत. परंतु, ते राष्ट्रवादी पक्षात असते आणि आज त्यांनी ही भूमिका घेतली असती तर त्यांना आम्ही माफ केल नसतं, असं मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं आहे. 

महत्वाच्या बातम्या