कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार, दिग्गजांचा भाजपमध्ये प्रवेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jan 2017 09:34 PM (IST)
NEXT
PREV
कोल्हापूर: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कोल्हापुरात भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडलं आगे. हातकणंगले आणि चंदगड या दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपसोबत स्थानिक आघाडी केली आहे. तर गोकुळच्या आजी आणि माजी संचालकांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशील माने, आणि विधानपरिषेदे माजी सभापती बाबासाहेब कुपेकर यांची कन्या नंदाताई बाभुळकर यांनी भाजपसोबत आघाडी करण्यास पसंती दिली आहे.
तर गोकुळचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक रणजितसिंह पाटील यांनी मात्र गटातटासह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळं भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या समोर आव्हान उभं केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -