बारामती: केवळ चार खासदार असलेल्या शरद पवारांच्या निवृत्तीची वेळ आली, असं म्हणत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शरद पवारांना खोचक सल्ला दिला आहे. ते आज बारामतीमध्ये आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

देशमुख म्हणाले की, ''राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्याचे खासदार कधी पक्ष सोडतील याची शाश्वती राहिली नाही, त्यामुळे त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी,'' असा सल्ला त्यांनी दिला.

''देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारामतीचं कौतुक करतात, परंतु प्रत्यक्षात मात्र वेगळीच परिस्थिती आहे. 70 हजार कोटी रुपये खर्चूनही बारामतीच्या जिरायत भागात पाणी आलं नाही, ही दुर्भाग्याची बाब असल्याचं,'' मत देशमुख यांनी व्यक्त केलं