सांगली : जिल्ह्यातील कुपवाड भागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षचा दिवसाढवळ्या खून झालाय. दत्तात्रय महादेव पाटोळे, असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून दिवसाढवळ्या पाठलाग करून तिघा हल्लेखोरांनी शस्त्राने भोसकून खून केल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. मिरज औद्योगिक वसाहतीमधील हॉटेल अशोकासमोरील रोहिणी ऍग्रोटेक कोल्डस्टोअरेजमध्ये पाटोळे यांचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह सापडला.


प्राथमिक तपासात पाटोळे यांचा खून आर्थिक वादातून झाला असावा अशी शक्‍यता पोलिसानी व्यक्त केली आहे. तिघा हल्लेखोरांनी खून करून पलायन केले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांना तातडीने तपासाबाबत सूचना दिल्या असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. प्राथमिक तपासात आर्थिक वादातून खून झाला असावा, अशी शक्‍यता आहे. कुपवाड एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत.


उस्मानाबाद जिल्ह्यातील परंड्यात पोलीस अत्याचाराच्या निषेधार्थ गाव बंद


पाठलाग करुन निघृण खून
दत्तात्रय पाटोळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रीय पदाधिकारी आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार पुरवण्याचे त्यांच्याकडे कंत्राट होते. दुपारी 12 च्या सुमारास ते दुचाकीवरून मिरज औद्योगिक वसाहतीकडे जात असताना हॉटेल अशोकासमोर आले असता तिघांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्ल्यात ते दुचाकीवरून खाली पडले आणि जीव वाचवण्यासाठी पळू लागले. हॉटेल अशोकासमोरच असलेल्या रोहिणी ऍग्रोटेक कोल्डस्टोअरेजमध्ये त्यांनी धाव घेतली. तेव्हा हल्लेखोरानी आतमध्ये घुसून पाटोळे यांना गाठत धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्‍यावर आणि इतरत्र वार केले.


घटनेनंतर हल्लेखोर पसार
निर्घृणपणे वार झाल्यामुळे काही क्षणातच पाटोळे मृत झाले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. खुनाची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस तत्काळ धावले. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीपसिंह गिल, कुपवाडचे सहाय्यक निरीक्षक नीरज उबाळे आणि पथक घटनास्थळी होते. परिसरात नागरिकांची गर्दी जमली. गर्दी हटवून पंचनामा करण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा खून झाल्याचे समजताच शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, नगरसेवक विष्णू माने आदींनी घटनास्थळी धाव घेतली.


NCP Leader Dattatray Patole Murder | सांगलीत कुपवाडमध्ये राष्ट्रवादी शहर उपाध्यक्षाची हत्या