मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विधानपरिषदेवर (Legislative Council) कोणाला पाठवण्यात येणार याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अनेकजण विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या उमेदवाराचं नाव उद्या जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्या दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरीवर बैठक होणार आहे. या बैठक एका नावावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे.  

Continues below advertisement

या नावांची चर्चा?

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, कोअर कमिटीने निश्चित केलेल्या नावांपैकी काही नावांवर उद्या चर्चा होणार आहे. बैठकीनंतर उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात येणार आहे. सध्या पक्षाकडून विधान परिषदेसाठी कागदपत्रे गोळा करण्याच्या सुचना झिशान सिद्धकी, संजय दौंड, उमेश पाटील यांना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळं या तिघांपैकी एकाला विधानपरिषदेवर संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. राजेश विटेकर विधानसभेत गेल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा रिक्त आहे. या जागेसाठी 100 हून अधिक इच्छुकांचे अर्ज आले आहेत. 

विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान

विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलाय. त्यानुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय पक्षांत वेगवान घडामोडी घडत आहेत. भाजपकडून विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपकडून तीन उमेदवार परिषदेच्या रिंगणात असणार आहेत. त्यामध्ये, महाराष्ट्र भाजपकडून दिल्लीसाठी दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी या तीन निष्ठावंत नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या तीन नेत्यांची नावे दिल्लीला पाठविण्यात आल्याचे समजते. दरम्यान, विधान परिषदेच्या 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यातील असून राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाची एक जाग आहे. 10 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 17 मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे .18 मार्चला उमेदवारी अर्ज यांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 20 मार्च आहे .27 मार्चला सकाळी नऊ ते संध्याकाळी चार या वेळेत मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!