NCP Crisis LIVE Updates : अजित पवारांचा जुना व्हिडीओ मनसेने बाहेर काढला, शिंदेंच्या बंडावेळी दादा काय म्हणाले? पाहा व्हिडीओ

NCP Breaking News : निवडणूक आयोगाने शरद पवार (Sharad Pawar) गटाला धक्का दिला असून पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या बाजूने दिला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Feb 2024 03:37 PM
MNS on Ajit Pawar : अजित पवारांचा जुना व्हिडीओ मनसेने बाहेर काढला, शिंदेंच्या बंडावेळी दादा काय म्हणाले? पाहा व्हिडीओ

MNS on NCP Crisis LIVE Updates : अजित पवारांचा जुना व्हिडीओ मनसेने बाहेर काढला, शिंदेंना शिवसेना मिळाली तेव्हा अजित पवार काय म्हणाले होते? पाहा व्हिडीओ


 





Rahul Narwekar : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात निवडणूक आयोगाच्या निकालाचा संबंध नाही

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रप्रकरणी (NCP MLA disqualification case) मेरिटनुसारच निकाल दिला जाईल. निवडणूक आयोगाने (Election Commission of India) दिलेल्या निकालाचा कुठलाही संबंध या निकालाशी जोडला जाणार नाही, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी सांगितलं. राष्ट्रवादी पक्षाबाबत विधान भावनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेली नाहीत, असं राहुल नार्वेकर म्हणाले. निवडणूक आयोगाने 6 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत आता राष्ट्रवादीचे कोणते आमदार पात्र आणि अपात्र होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra Political News : अजित पवारांचा जुना व्हिडीओ मनसेकडून ट्वीट

NCP Crisis LIVE Updates : मागील दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण (maharashtra politics) ढवळून निघालेय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यानंतर अजित पवारांनीही (Ajit Pawar) बंड केले. पक्षावर आणि चिन्हावर दावा केला, ते त्यांना मिळालेही.  मंगळवारी निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांनं दिलं. यावरुन मनसेनं (MNS) आपल्या खास शैलीत टीकास्त्र सोडलेय. अजित पवारांवर (Ajit Pawar Video) निशाणा साधलाय. दरम्यान, त्याआधी वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं होतं. त्यावेळी विरोधीपक्षात असणाऱ्या अजित पवारांनी खणखणीत भाषण करत टीका केली होती. अजित पवारांच्या भाषणातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तोच व्हिडीओ पोस्ट करत मनसेनं निशाणा साधलाय. वाचा सविस्तर...

Maharashtra NCP News Updates : राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांची तटस्थ भूमिका

Maharashtra NCP Crisis LIVE Updates : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांना मिळाल्यानंतर आता विविध राज्यातील प्रदेशाध्यक्ष यांनी तटस्थ भूमिका घेतल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल आणि कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष आर हरी यांनी सध्या तरी कोणतीही भूमिका घेणार नसल्याची एबीपी माझाला माहिती दिली आहे. सध्या दोन्ही गटाच्या वतीने संपर्क करण्यात येत आहे, मात्र आम्ही भूमिका सध्या जाहीर करणार नसल्याची माहिती दोन्ही प्रदेशाध्यक्षांनी दिली आहे.

Sharad Pawar Party New Name and Symbol : शरद पवार गटाकडून नवे नाव, चिन्हासाठी चाचपणी सुरु

Sharad Pawar New Party Name and Symbol : राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी समोर आली आहे. पक्षाचं चिन्ह आणि पक्ष अजित पवारांकडे सोपवल्यावर आता शरद पवार गटाकडून नव्या नावांचा विचार सुरू आहे. शरद  पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी, शरद स्वाभिमानी पक्ष या नावांचा पर्याय सध्या चाचपून पाहिला जातोय. तर कपबशी, सूर्यफूल, चष्मा, उगवता सूर्य या चिन्हांचा विचार सुरू आहे.

People's Reaction on NCP Crisis : ''अजित पवारांनी शरद पवारांना सोडायला नव्हतं पाहिजे''

Maharashtra News Latest Update : अजित पवारांनी काटेवाडीचा विकास केला पण शरद पवारांना अजित पवारांनी सोडायला नव्हतं पाहिजे, अशी प्रतिक्रिया काटेवाडी इथल्या जेष्ठ मंडळींनी दिली आहे. आमच्या पुढं कोणाला निवडायचं हा मोठा प्रश्न आहे, असं देखील काटेवाडीकर म्हणत आहेत. आम्हाला अजित पवारही सारखे आणि शरद पवार सारखे पण विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही अजित पवारांसोबत जाणार असल्याचे इथली जेष्ठ मंडळी सांगतात.

Anna Bansode on NCP Crisis : शरद पवारांचा पराभव झाला, असं म्हणता येणार नाही - अण्णा बनसोडे

NCP News Update : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळालं, म्हणजे शरद पवारांचा पराभव झाला, असं म्हणता येणार नाही, असं अण्णा बनसोडे यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शरद पवारांचा पराभव झाला, असं म्हणता येणार नाही. ते आमचे आदर्श नेते आहेत, त्यांनी आम्हाला फक्त मार्गदर्शन करावं. यापुढं आम्हाला अजित पवारांच्या नेतृत्वाखालीच काम करायचं आहे. अशी प्रतिक्रिया पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडेंनी दिली आहे.

Sharad Pawar vs Ajit Pawar : शरद पवार काय भूमिका घेणार? 

NCP Crisis LIVE Updates : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांकडे  निवडणूक आयोगनाने दिले आहे. त्यामुळे आता शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी पक्ष गेला असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे आता शरद पवारांना नवं चिन्ह शोधावं लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून तयारी देखील सुरु करण्यात आली होती. जर निवडणुक आयोगाचा निर्णय आपल्या बाजूने नाही आला तर पक्षाच्या चिन्ह काय असणार यासंदर्भात शरद पवार गटाची बैठक देखील पार पडली होती. 

Maharashtra News, NCP Crisis : निवडणूक आयोगाकडून भूमिका स्पष्ट, आता नार्वेकरांच्या निकालाकडे लक्ष

Maharashtra Politics : मुंबई : राष्ट्रवादी (NCP) पक्ष आणि चिन्हावर निवडणूक आयोगाकडून (Election Comission) निकाल देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार (Ajit Pawar) गटाला दिलं असून शरद पवार (Sharad Pawar) गट हा स्वतंत्र्य गट असल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा निर्णय स्पष्ट झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

Amol Kolhe Latest News : खासदार अमोल कोल्हे नेमके कोणाचे

NCP Breaking News, Amol Kolhe : राष्ट्रवादीला खिंडार पाडल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेले एक नाव म्हणजे डॉ. अमोल कोल्हे. अमोल कोल्हे अजूनही द्विधा मनस्थितीत आहेत का? असाच प्रश्न त्यांच्या संशयास्पद भूमिकेवर निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला दिल्यानंतर जी प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत त्यामध्ये एकमेव अमोल कोल्हे असे आहेत ज्यांनी दोन्ही गटाकडे प्रतिज्ञापत्र दिल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. इतकंच नव्हे तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर ज्यावेळी त्यांचा शपथविधी सोहळा झाला त्यावेळी सुद्धा अमोल कोल्हे उपस्थित राहिले होते. 


 

Maharashtra NCP Latest News Update : राजकारणातील घडामोडींवर सर्वसामान्यांची प्रतिक्रिया

People Reaction on Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळालं. या राजकारणातील घडामोडींवर सर्वसामान्यांची काय प्रतिक्रिया आहे, जाणून घ्या. वाचा सविस्तर...

Supriya Sule on NCP Crisis : वडिलांचा पक्ष भावाच्या हाती! सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया..

NCP Crisis Supriya Sule Reactio : वडिलांचा पक्ष भावाच्या हाती गेल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.


 



 

Maharashtra News : अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर काटेवाडीत जल्लोष

NCP Crisis LIVE Updates : उपमुख्यमंत्री अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर काटेवाडीत जल्लोष करण्यात आला. लाडू भरवून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तर त्यावेळी शरद पवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ज्या शरद पवारांच्यासाठी फटाके वाजवले त्यांचाच पक्ष काढून घेतल्यानंतर हे जल्लोष करतात असं मत शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं.

NCP Crisis LIVE Updates : शरद पवार गटाला निवडणूक आयोगामध्ये माहिती सादर करण्यासाठी दुपारपर्यंत मुदत

Maharashtra News : शरद पवार गटाला आज दुपारपर्यंत पक्ष चिन्ह याबाबत निवडणूक आयोगामध्ये माहिती सादर करायचे आहे जर माहिती आज दिली गेली नाही तर त्यांना स्वतंत्र गट समजला जाईल. शरद पवार गटाकडून पक्ष चिन्ह ठरला असून दुपारपर्यंत निवडणूक आयोगामध्ये ही माहिती दिली जाईल. पक्षाच्या नावामध्ये राष्ट्रवादी हा शब्द आहे तर चिन्ह हे सर्वसामान्य जीवनाशी संबंधित वस्तू असण्याची शक्यता आहे.

NCP Crisis LIVE Updates : पक्ष कार्यालयावरून संघर्ष पाहायला मिळणार? 

Maharashtra Political News Update : शिवसेनेत झालेल्या गटबाजीनंतर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह दिले होते. त्यामुळे पुढे दोन्ही गटात अनेक मुद्यावरून वाद पाहायला मिळाले. विशेष म्हणजे राज्यभरातील पक्षाचे कार्यालय आपल्या ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटात संघर्ष देखील पाहायला मिळाला. आता राष्ट्रवादीत देखील अशीच काही परिस्थिती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील अनेक महत्वाच्या शहरात राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय असून, ते आपल्या ताब्यात घेण्यासाठी अजित पवार गटासह शरद पवार गटाकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

NCP Crisis News : राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दावे प्रतिदावे केले जाण्याची शक्यता

NCP Politics : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना (Ajit Pawar) निवडणूक आयोगाने दिल्यावर शरद पवारांसाठी (Sharad Pawar) हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) या निर्णयानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात आता अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवारांच्या बाजूने निकाल लागल्यामुळे 'राष्ट्रवादी'त काय घडू शकतं? याबाबत काही शक्यता वर्तवल्या जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून पक्षाच्या कार्यालयासह अनेक गोष्टींवर दावे प्रतिदावे केले जाण्याची शक्यता आहे. 

Mumbai NCP Banners : शरद पवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

Sharad Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून त्याविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी कांग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर शरद पवार यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी होताना दिसत आहे. पक्ष आणि चिन्ह दोन्ही अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर पक्षाची कार्यालये देखील ताब्यात जाण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar Banner : जो अपना नहीं हुआ, वो जनता का क्या होगा; शरद पवारांच्या घराबाहेर बॅनरबाजी

NCP Politics Crisis Live Update : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिल्लीतील शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर आज सकाळीच बॅनर लावून अजित पवारांच्या गटाला टोला लगावण्यात आला आहे. 'जो अपना नहीं हुआ, वो जनता का क्या होगा', अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली आहे.

MNS Reaction on NCP Crisis : 'काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्प'

MNS Tweet in NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर मनसे पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पोस्ट करत लिहिलं आहे की, 'बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोप्प आहे, पण बुजुर्ग नेत्याचा अवमान न करता स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष उभा करणं, चिन्ह मिळवणं ह्यासाठी 'राज ठाकरे' यांच्यासारखा संघर्ष आणि संयम लागतो, हिंमत लागते... असो, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ!'

Sharad Pawar vs Ajit Pawar LIVE Updates : अजित पवार गटाचा एकच जल्लोष

NCP Crisis LIVE Updates : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाले. त्यानंतर अजित पवार गटाने राज्यात एकच जल्लोष साजरा केला गेला. परंतु ज्या राजकारणाची सुरुवात अजित पवारांनी बारामतीमधून केली.

NCP Crisis LIVE Updates : राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष अजित पवारांकडे

Maharashtra Political LIVE Updates : आगामी लोकसभा निवडणूकीआधी शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Breaking News) पक्ष आणि चिन्हा संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाप्रमाणे बंडखोरी केलेल्या अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह आणि पक्ष मिळालं आहे. शरद पवार यांना निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का बसला आहे.

पार्श्वभूमी

Maharashtra Politics Live Updates : शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने जो न्याय शिवसेनेच्या शिंदे गटाला तोच न्याय आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचं असल्याचं निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षाचा निकाल हा अजित पवार गटाच्या बाजूने लागला असून हा शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. त्यामुळे येत्या निवडणुकीत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर निवडणूक लढवावी लागेल हे स्पष्ट झालंय. 


निवडणूक आयोगाच्या या निकालाने येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत मात्र शरद पवार गटाचा कस लागणार असून त्यांना अजित पवार गटाच्या अनिल पाटलांचा व्हिप पाळावा लागेल असं चित्र दिसतंय. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.