गडचिरोली : राज्यात नुकत्याच नगरपंचायत निवडणूका पार पडल्या असून गडचिरोलीतही नगरपंचायत निवडणुकांनंतर नक्षलवादी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. छत्तीसगड सीमेवरच्या नेलगुंडा येथे रस्ते बांधकामावरील सुमारे 20 वाहने जाळून नक्षलवाद्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. इरपनार- नेलगुंडा- धोडराज परिसरात अतिदुर्गम भागात सुरू काही रस्त्याची कामे सुरु होती.  मागील 6 महिने शांतता असलेला हा परिसर वाहन जाळपोळीने पुन्हा एकदा दहशतीखाली आला आहे.


जाळपोळीच्या ठिकाणी भामरागड एरीया कमिटीच्या नक्षल्यांनी बॅनर लावत रस्ते निर्मिती-पूल बांधकामाला विरोधही दर्शवला आहे. विशेष म्हणजे घटनेच्या दिवशीच गडचिरोली पोलिसांनी आपल्या जनजागृतीपर डिजिटल प्रचारात रस्ते निर्मिती आणि नक्षलवाद्यांची खंडणी या विषयावर भाष्य केले होते. हा डिजिटल प्रसार माध्यमांवर प्रदर्शित होऊन 24 तास होत नाहीत तोच नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली आहे.


नेमकं काय घडलं?


राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे गडचिरोलीतही नुकत्याच नगरपंचायत निवडणुका यशस्वीपणे संपन्न झाल्या. त्यानंतर आता काही दिवसांतच नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा दहशत पसरवण्यासाठी म्हणून जाळपोळीसारख्या घटना सुरु केल्या आहेत. छत्तीसगड सीमेवरच्या भामरागड तालुक्यातील नेलगुंडा येथे दहशतवाद्यांनी रस्ते बांधकामाचे काम बंद पाडत ही जाळपोळ केली. यावेळी सुमारे 25 च्या संख्येने नक्षली याठिकाणी भरदुपारी पोहचले. मजुरांना काम बंद करण्यासाठी सांगितल्यावर त्यांनी सुमारे 20 वाहनांना आग देखील लावली. यात 15 ट्रॅक्टर, 2 जेसीबी, 1 लोडर आणि इतर काही वाहनांच समावेश आहे. तर जाळपोळीच्या ठिकाणी भामरागड एरीया कमिटीच्या नक्षल्यांनी बॅनर लावत रस्ते निर्मिती-पूल बांधकामाला विरोध दर्शविला आहे. तर जिल्ह्याचे औद्योगिक भविष्य असलेला सुरजागड लोहखनिज खोदकाम प्रकल्प त्वरीत थांबविण्याची मागणी केली आहे. 


हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha