अमरावती : शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी पोलिस आयुक्तलयावर भव्य मोर्चा काढला. काही दिवसांपूर्वीच आमदार रवी राणा यांच्या विरोधात खासदार अडसूळ यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता.

खासदार अडसूळ यांनी आमदार राणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर, रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनीही खासदार अडसूळ यांच्यावर खंडणीचा आणि त्यांचे तीन साथीदारांवर खंडणी आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. ज्यामुळे या दोघांचे वाद आता विकोपाला गेले आहे.

खासदार अडसुळांविरोधात नवनीत राणांचा मोर्चा


आज नवनीत राणा या शेकडो महिला कार्यकर्त्यांसह पोलिस आयुक्त आयुक्तलयावर धडकल्या आणि खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधातील पुरावे पोलीस आयुक्तांना सादर केले. ज्यामध्ये कॉल डिटेल्स, व्हिडीओ शूटिंग, सोशल मीडियावरील माहितीचा समावेश असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले.

तसेच, खासदार अडसूळ आणि त्यांच्या सहकार्यांना पोलीस अटक केव्हा करतील, असा सवालही नवनीत राणा यांनी यावेळी केला.