नवी मुंबई : पनवेलच्या आकुर्ली भागात राहणाऱ्या अंजली पवार या 27 वर्षीय तरुणीच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. शारीरिक संबंधांवरुन झालेल्या वादातून 23 वर्षीय राजकुमार पांडेने तरुणीची हत्या केल्याचा आरोप आहे.

गुन्हे शाखेच्या पथकानं राजकुमार पांडे या तरुणाला अटक केली आहे. घटनेच्या दिवशी राजकुमार अंजलीला भेटण्यासाठी गेला होता. मात्र शारीरिक संबंध ठेवण्यावरुन दोघांमध्ये वाद झाले आणि त्याने अंजलीची गळा चिरुन हत्या केली.

आरोपी रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून, तो घरफोडी करण्यात सराईत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे हत्येच्या सात दिवसाआधीच राजकुमार हा सहा महिन्याची शिक्षा भोगून तुरुंगात सुटला होता. आठवडाभरापूर्वी अंजली पवारची हत्या झाल्याची घटना समोर आली होती.