नवी मुंबई : राज्यभरातील मराठा मोर्चांचं लोण आता मुंबईच्या प्रवेशद्वारापाशी आलं आहे. आज नवी मुंबईतल्या खारघर सेन्ट्रल पार्क ते सीबीडी कोकण भवन पर्यंत मराठा मूक मोर्च्याचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी मुंबई सोबतच सोलापुरातही मराठा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. रायगड आणि नवी मुंबई असा दोन विभागांचा हा मोर्चा असल्यानं यात मोठा जमाव सहभागी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी ठिकठिकाणी बैठकांचं सत्र सुरु आहे. खारघर सेन्ट्रल पार्कपासून मोर्चा सकाळी 10 वाजता सुरु होईल , पुढे उत्सव चौक, भारती विद्यापीठ , सीबीडी बस डेपो , कोकण भवन असा मोर्चाचा मार्ग आहे. मोर्चाच्या मार्गावर होणारा कचरा गोळा करण्यासाठी स्वच्छता टीमही तैनात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या मोर्चात शिस्तीचं पालन होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. मराठा समाजाच्या वतीने विविध संघटनांच्या माध्यमातून पुणे, सांगली, सातारा, बारामती आदी ठिकाणीही विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. यापूर्वी कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या वतीने नांदेड, जालना, अकोला, लातूर, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, परभणी या ठिकाणी भव्य मोर्चे काढण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

 

मराठा मोर्चांवर सर्व नेत्यांनी एकत्रितपणे चर्चा करावी : मुख्यमंत्री

मराठा समाजाचे मोर्चे दलितविरोधी नाहीत, भय्यूजी महाराजांचं स्पष्ट मत

विनायक मेटे आणि मराठा मोर्चांचा संबंध नाही : मराठा संघटना

मुख्यमंत्र्यांचा मराठा मोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्नः विखे पाटील

मराठा मोर्चे हे दलितविरोधी नाहीत : विनायक मेटे

मराठा मोर्चा दलितविरोधी असल्याचा प्रचार संघाचा: प्रकाश आंबेडकर

कितीही मोर्चे निघूदेत, अॅट्रॉसिटी रद्द होणार नाही : आठवले

अॅट्रॉसिटी कायदा रद्दच करावा, खासदार उदयनराजे आक्रमक

अॅट्रॉसिटीच्या मुद्द्यावर शरद पवार विरुद्ध सुशीलकुमार शिंदे

सवर्णांकडून दलितांचा वापर करुन अॅट्रॉसिटीचा गैरवापर : शरद पवार