मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


भोंग्यांबाबत आज नियमावली  जाहीर होण्याची शक्यता


राज ठाकरेंनी भोंग्यांबाबतचा अल्टिमेटम दिल्यानंतर आता राज्य सरकारची धावाधाव पाहायला मिळतेय... भोंग्यांबाबत आज नियमावली  जाहीर होणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. याबाबत उद्या मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीतला अहवाल गृहमंत्र्यांना सादर करुन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.


हिंसाचारावर मोदींना  विरोधकांचं पत्र, ठाकरेंनी सही करणं टाळलं


देशभरातील हिंसाचारावर 13 विरोधी पक्ष नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सहीच नसल्यानं चर्चांना उधाण आलंय... सोनिया गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जींसह इतर 13 विरोधकांनी पत्र लिहित मोदी देशातील हिंसाचाराच्या घटनांवर बोलत का नाहीत?, असा प्रश्न उपस्थित केला आणि याच पत्रावर उद्धव ठाकरेंची सही नाही. हिंदू मतं दुरावण्याच्या भीतीनं उद्धव ठाकरेंनी सही केली नसल्याची चर्चा सध्या सुरु आहेत


ऊर्जा विभागाची आज 12 वाजता महत्त्वाची बैठक


राज्यातील वीज टंचाईच्या प्रश्नावर मुख्यमंत्री यांनी ऊर्जा विभागाची बैठक बोलावली. उद्या 12 वाजता बैठक होणार  आहे. राज्यातील अनेक विद्युत निर्मिती केंद्रांवर कोळशाचा तुटावडा जाणवत आहे.  नाशिक आणि भुसावळ विज निर्मिती केंद्रांवर फक्त दिड दिवस पुरेल एवढाच कोळाशाचा साठा तर इतर केंद्रांवर दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच कोळशाचा साठा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्या  आढावा बैठक घेणार आहेत. राज्य अंधारात जाऊ  नये यासाठी करणार उपाययोजना करण्यात येणार आहेत


आरोपी संदीप गोडबोलेला आज गिरगाव न्यायालयात हजर करणार


शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या घरावर आंदोलन केल्याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांपैकी एका आरोपीला ताब्यात घेत पोलिस कोठडी देण्यात आली होती. ती आज संपत आहे. त्याचसोबत नागपूर कनेक्शन असलेला आरोपी संदीप गोडबोले याची देखील कोठडी संपत असल्यानं दोघांनाही आज गिरगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे


विदर्भातील अकोला आणि चंद्रपुरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता


 आज विदर्भातील अकोला आणि चंद्रपुरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. सोबतच विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस देखील पडतोय.  21 आणि 22  एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता. त्यामुळे उकाड्यापासून राज्यातील जनतेला दिलासा मिळणार आहे


आज अंगारकी चतुर्थी


गणेश भक्तांसाठी अतिशय महत्वाची असणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आज आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थी दिवशी गणपतीची आराधना आणि व्रत केल्यास वर्षभरातील संकष्टीचे पुण्य मिळते, अशी भावना आहे.


भारताने विकसीत केलेल्या पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण


आर्यभट्ट् हा भारताने विकसीत केलेला पहिला उपग्रह आहे. भारतीय गणितज्ञ व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव या उपग्रहाला देण्यात आले आहे. या उपग्रहाचे प्रक्षेपण तेव्हाच्या सोविएत संघराज्यातील व आतच्या रशिया मधिल कापुस्टीन यार या अवकाश केंद्रावरून 19  एप्रिल 1975 साली कॉसमॉस-3 एम हा उपग्रह वाहक वापरून करण्यात आले.


आज लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने सामने


आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 31 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने सामने येणार आहे. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होईल. त्याआधी अर्धातास नाणफेक होईल. केएल राहुल लखनौच्या संघाचं नेतृत्व करत आहे. तर, फाफ डू प्लेसिसकडं बंगळुरूच्या संघाचं कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या हंगामात दोन्ही संघानं चांगली कामगिरी करून दाखवली आहे. ज्यामुळं आजचा सामना रोमाचंक होण्याची शक्यता आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आज गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस आहेत. आज बनासकंठ आणि जामनगर जिल्हातील दौऱ्यावर आहेत. 


जहांगीरपुरी हिंसाचारावर अमित शाह यांचे पोलिसांना कडक निर्देश


 दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीनिमित्त झालेल्या हिंसाचाराची सर्वत्र चर्चा आहे. या प्रकरणी आतापर्यंत 22 जणांना अटक करण्यात आली असून, त्यावरून राजकारणही सुरू झाले आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली हिंसाचारावर मोठे वक्तव्य केले आहे. अमित शाह यांनी दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत की, दंगलखोरांवर अशी कडक कारवाई करा की दिल्लीत पुन्हा अशी दंगल आणि हिंसाचार घडू नये.


डब्ल्यूएचओ ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन


जामनगरमध्ये डब्ल्यूएचओ ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिनची (जीसीटीएम) पायाभरणी


फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी 


 फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे


उत्तरप्रदेशचे  सीएम योगी आदित्यनाथ  आज 1970 साली पूर्व पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या 63 हिंदू बंगाली परिवारांचे पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्री आवास योजनेचे स्वीकृती पत्र देण्यात येणार आहे.


खरीफ अभियान 2022 कृषी संमेलनाचे  उद्घाटन


खरीफ अभियान 2022 साठी राष्ट्रीय कृषी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. कृषी मंत्र्यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. 


आज इतिहासात


1451 - बहलोल लोदी यांनी दिल्लीवर ताबा मिळवला होता. 


1770- कॅप्टन जेम्स कुक ऑस्ट्रेलियात पोहचणारे पहिले पश्चिमी व्यक्ती होते.


1775- अमेरिकेत क्रांतीची सुरूवात


1882 - कोलकातामध्ये पहिल्यांदा प्रसुती रुग्णालयाची सुरूवात झाली


1910 - हॅले धुमकेतूचे पहिल्यांदा दर्शन झाले


1919 - अमेरिकेचे लेस्ली इरविन यांनी पहिल्यांदा पॅराशूटच्या साहय्याने उडी मारली


1950 - श्यामा प्रसाद मुखर्जी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा देणारे पहिले मंत्री 


1971 - भारताने वेस्ट इंडीजला हरवून टेस्ट मॅच जिंकली


1972 - बांग्लादेश राष्ट्रमंडळाचा सदस्य बनला


2020- कोरोना व्हायरसमुळे दिल्ली नवजात शिशूचा मृत्यू