एका नोटेची किंमत |
नोटांची संख्या | एकूण रक्कम |
500 | 1.3 कोटी | 650 कोटी |
100 | 3.1 कोटी | 310 कोटी |
20 | 3 कोटी | 60 कोटी |
7.4 कोटी | 1 हजार 20 कोटी |
नाशिक प्रेसमधून तब्बल 1 हजार कोटींच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Nov 2016 08:50 AM (IST)
NEXT
PREV
नाशिक : नाशिकच्या सिक्युरिटी प्रिटिंग प्रेसमधून पाचशे, शंभर आणि 20 रुपयांच्या 7 कोटी 40 लाख नोटा रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात आल्या आहेत. या विविध रकमेच्या सर्व नोटांची एकूण किंमत एक हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा निर्माण झाला होता. तो काही प्रमाणात कमी होण्याची चिन्हं आहेत. नव्याने छापण्यात आलेल्या नोटांमध्ये पाचशे रुपयाच्या 1.3 कोटी, शंभर रुपयांच्या 3.1 कोटी, तर वीस रुपयांच्या 3 कोटी नोटांचा समावेश आहे.
देशातील नऊ सिक्युरिटी प्रिटींग प्रेसपैकी नाशिक एक आहे. सोमवार आणि मंगळवारी अशा दोन टप्प्यात या नोटा रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात आल्या आहेत. यापूर्वी 11 नोव्हेंबरला पाचशे रुपयाच्या 5 लाख नोटा प्रिंटींग प्रेसमधून रवाना करण्यात आल्या होत्या.
नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये युद्धपातळीवर नोटांची छपाई सुरु करण्यात आली आहे. नोटा बदलाच्या निर्णयानंतर राज्यात चलनाची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली. त्यावर मात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्यात.
दरम्यान, या कामासाठी सिक्युरिटी प्रेसमधील कामगारही मोठी मेहनत घेत आहेत. याची दखल घेत सरकारने त्यांच्या महागाई भत्त्यात 7 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला.
चलन तुटवड्यामुळे सध्या देशभरात नागरिकांचे मोठे हाल सुरु आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांच्या हाती नव्या नोटा आल्या नाहीत, त्यांना त्रास सहन करावा लागतोय. याचे पडसाद उमटतानाही दिसतायेत. यासंदर्भात पंतप्रधानांनी त्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरिय बैठक बोलावली होती. यावेळी जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय 24 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -