नाशिक सायबर पोलिसांनी कोल्हापुरच्या आजरा तालुक्यातून संबंधित तरुणाला अटक केली आहे. त्यानंतर पालिसांनी तरुणाची चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या काही लोकांचा फेसबुकवर गृप कार्यरत असल्याचे या तरुणाने सांगितले आहे. या ग्रुपमधील लोक मेसेंजरच्या माध्यमातून चॅटींग करत नवीन तरुणांना हेरुन त्यांना 10 टक्के कमिशन दिले जाते. ऋषिकेशलाही अशाच प्रकारे कमिशन देण्यात आले होते, असे त्याच्या चौकशीमध्ये समोर आले आहे.
अशाप्रकारे एक मोठे रॅकेट कार्यरत असून बिहार, उत्तरप्रदेश यासोबतच पाकिस्तानमधील काही जणांचा यात समावेश असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांचा पुढील तपास सूरु आहे.
'कौन बनेगा करोडपती'चं तुम्हाला तिकीट मिळालंय त्यासोबतच 25 लाख रूपयांची लॉटरीही लागल्याचं अमिष दाखवून काही दिवसांपूर्वी नाशिकमधील एका महिलेची 2 लाख 86 हजार रूपयांची फसवणूक करण्यात आली होती. गंगापूरमध्ये राहणाऱ्या नम्रता त्रिशे यांना आनंदकुमार सिंह नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. नम्रता त्रिश यांच्या तक्रारीनूसार अज्ञाताविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.