नाशिक : सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी 10 वर्षांखालील मुलं आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आलीय. वणीच्या सप्तश्रृंगी देवस्थान समितीने हा निर्णय घेतलाय. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.


नाशिक मागील आठ दिवसापासून सातत्याने रुग्ण संख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून देवस्थान ट्रस्ट लहान आणि ज्येष्ठांना प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे.  हा निर्णय घेणारे पहिलेच देवस्थान ठरले आहे, त्यामुळे राज्यातील इतर मंदिरात स्वयंस्फूर्तीने आशा स्वरूपाचे निर्णय घेते जातात का असा सवाल उपस्थित होत आहे,


भाविकांना या निर्णयाची कल्पना नव्हती, अचानक  घेतलेल्या या निर्णयामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. मुलांना कुठं  ठेवायचे हा प्रश्न उपस्थित होत आहे. यासह लसीकरणचा  कमीतकमी एक डोस,, मास्क, सोशल डीसस्टँसिंग बंधनकारक करण्यात आला आहे. 


 नाशिकमध्ये प्रशासन,आरोग्य विभाग सज्ज नाशकात 8 हजार 200 बेड सज्ज


नाशिक शहरातील कोरोना रूग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.  बेडच्या उपलब्धतेबरोबरच ऑक्सिजनचा मुबलक साठाही तयार करण्यात आला आहे.  नाशिक जिल्ह्यासाठी 400 मेट्रीक टन तर मनपा हद्दीत 250 मेट्रीक टन  ऑक्सिजनची उपलब्धता होणे अपेक्षित होते मात्र एकट्या महापालिका हद्दीतच 400 मेट्रीक टनच्या जवळपास ऑक्सिजनची उपलब्धता करण्यात आली आहे. नाशिक मनपाच्या झाकिर हुसेन आणि बिटको रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाक्या उभारण्यात आल्यात तर खाजगी हॉस्पिटलने ही ऑक्सिजन प्रकल्प उभारले आहेत.  या व्यतिरिक्त शहरात आजमितीस 8200 बेड उपलब्ध आहेत यात 3500 ऑक्सिजन बेड, 1 हजार आयसीयू आणि 798 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेतय जर गरज भासली तर शहरात कोव्हिडं सेंटरचे अतिरिक्त 5 हजार 500 बेड तात्काळ उपलब्ध करण्यात येणार आहे. महापालिकाचे 80 आणि कोरोना काळात भरती झालेले 164 असे एकूण 244 डॉक्टर उपलब्ध आहेत. महापालिका आणि खागजी मिळून 1400 कर्मचारी मनपाच्या सेवेत तैनात आहेत.