Nashik Hospital Oxygen Leak Live : नाशिकमधील दुर्घटनेतील मृतांची संख्या 24 वर

नाशिकच्या नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. 

एबीपी माझा वेबटीम Last Updated: 21 Apr 2021 03:05 PM
नाशिक मधील दुर्घटना प्रकरणी 7 सदस्यांनी समितीची घोषणा

नाशिक मधील दुर्घटना प्रकरणी 7 सदस्यांनी समितीची घोषणा, 10 दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना,  समितीने सादर केलेल्या एसओपी राज्याला मार्गदर्शक राहणार, त्यानुसार राज्यभर अंमलबजावणी होणार

आरोग्यमंत्री राजेश टोपे, मंत्री राजेंद्र शिंगणे, मंत्री बाळासाहेब थोरात नाशिकमध्ये दाखल

Nashik Hospital Oxygen Leak Live : आरोग्यमंत्री राजेश टोपे, मंत्री राजेंद्र शिंगणे, मंत्री बाळासाहेब थोरात नाशिकमध्ये दाखल
https://marathi.abplive.com/news/maharashtra/nashik-hospital-oxygen-leak-live-updates-coronavirus-positive-22-patients-dead-983244

अंबाजोगाईच्या घटनेमध्ये मृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना मदत द्यावी

नाशिकच्या घटनेनंतर अंबाजोगाईच्या स्वरातील रुग्णालयामध्ये अर्धा तासासाठी ऑक्सिजन बंद झाला होता, ज्यात सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या घटनेची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी भाजपचे आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे. विशेष म्हणजे या घटनेची चौकशी करून नाशिकच्या घटनेमध्ये मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत सरकारने दिली होती. तशीच मदत अंबाजोगाईच्या घटनेमध्ये मृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे

अशी घडली घटना

दुपारी 12 वाजता टॅंकर ऑक्सिजन भरण्यासाठी दाखल झाला. आज टॅंकर आला तेव्हा लीक होत असल्याचं निदर्शनास आले. बारीक छिद्र होते त्यातून ऑक्सिजन लीक होत होता. आंतरराष्ट्रीय कंपनी 'टाय यो निपोन' यांच्या माध्यमातून ऑक्सिजन टाकी उभारण्यात आली आहे.


देखभाल करण्याची जबाबदारी कंपनीची आहे.  कंपनीला ही माहिती कळवीत असतानाच छिद्र मोठे झाले आणि गॅस गळती वाढली. त्यानंतर मनपाच्या अग्निशमन दलाला आणि पोलिसांना पाचारण करण्यात आलं.


दरम्यान ज्या पाईपच्या माध्यमातून गॅस पुरवठा केला जातो तो पाईप बदलण्यात आला,  यात साधारण एक ते दीड तास लागला. या दरम्यान 22 रुग्णांचे प्राण गेले.  


यानंतर शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, खासदार हेमंत गोडसे, मनपा आयुक्त कैलास जाधव, महापौर सतीश कुलकर्णी ,पालकमंत्री छगन भुजबळ, मंत्री दादा भुसे, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. 

मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर

या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की , केवळ शोक सांत्वना करून चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे.

कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं- राज ठाकरे

ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं.- राज ठाकरे

नाशिकमधील दुर्घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय चौकशी समिती राज्य सरकारने नेमली

Nashik Hospital Oxygen Leak Live : नाशिकमधील दुर्घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय चौकशी समिती राज्य सरकारने नेमली, यात 1 आयएएस अधिकारी, इंजिनियर, एक डॉक्टर यांचा समावेश,  राज्य सरकार आणि मनपाकडून मृतांच्या वारसांना 5 -5 लाख रुपयांची मदत जाहीर

नाशिकमधील दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींच्या शोकसंवेदना

Nashik Hospital Oxygen Leak Live : नाशिकमधील दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींच्या शोकसंवेदना, म्हणाले, घटना हृदयद्रावक, या दुर्घटनेत ज्या लोकांनी आपल्या कुटुंबियांना गमावलं त्यांच्याप्रती संवेदना 
 https://marathi.abplive.com/news/maharashtra/nashik-hospital-oxygen-leak-live-updates-coronavirus-positive-22-patients-dead-983244

मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर

मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.  या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे.


नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की , केवळ शोक सांत्वना करून चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे.

दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल- उपमुख्यमंत्री अजित पवार

 नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. 


राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ अशी संपूर्ण आरोग्य यंत्रणा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी जोखीम पत्करुन कोरोनासंकटाशी लढत असताना अशी दुर्घटना घडणे अत्यंत दुर्देवी आहे. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींना निश्चित शिक्षा केली जाईल. यापुढे अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी घेतानाच, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सीजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. 

11 पुरुष आणि 11 स्त्री रुग्णांचा मृत्यू, घटनेची चौकशी केली जाईल, मी नाशिकला भेट देण्यासाठी जात आहे : राजेश टोपे

नाशिकची अत्यंत दुर्देवी घटना, 11 पुरुष आणि 11 स्त्री रुग्णांचा मृत्यू, घटनेची चौकशी केली जाईल, मी नाशिकला भेट देण्यासाठी जात आहे : राजेश टोपे

आम्ही सगळेच सर्व कुटुंबांच्या दु:खात सहभागी- आदित्य ठाकरे

नाशिक येथील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सगळेच या सर्व कुटुंबांच्या दु:खात सहभागी आहोत. पालकमंत्री छगन भुजबळ आणि सर्व अधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या संपर्कात आहेत. ह्या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी केली जाईल.- आदित्य ठाकरे

अमित शाहांनी व्यक्त केला शोक


नाशिकमधील ह़ॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळतीच्या घटनेची बातमी ऐकून सुन्न झालो आहे. ज्यांनी या अपघातात आपले प्रियजन गमावले त्यांच्या या नुकसानीबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. इतर सर्व रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी मी देवाला प्रार्थना करतो.- गृहमंत्री अमित शाह

नाशिकमधील रुग्णालयातील घटनेने मन सुन्न- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

नाशिकमधील ऑक्सिजन गळतीमुळे जी घटना घडलीय त्यामुळे मन सुन्न झालं आहे अशी भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली. 

निरपराध रुग्ण दगावल्याचे समजून तीव्र दुःख- राज्यपाल

नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय येथे ऑक्सिजन टाकीतून गळती होऊन काही निरपराध रुग्ण दगावल्याचे समजून तीव्र दुःख झाले. या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना आपल्या शोक संवेदना कळवतो व बाधित व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करतो. - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

नाशिक रुग्णालयातील ऑक्सिजन आता पूर्ववत

नाशिक रुग्णालयातील ऑक्सिजन आता पूर्ववत झाला आहे अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून दिली आहे. आतापर्यंत अनेक रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे. 

आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे चित्र- सुधीर मुनगुंटीवार

चंद्रपूर : नाशिकमधील प्राणवायू गळतीची घटना अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे चित्र आहे. यात मानवी चूक असेल तर चौकशी करून कारवाई करा, प्रशासन अधिक सुधारण्याची गरज आहे, जो प्राण वाचविणारा घटक आहे त्याचीच गळती म्हणजे गंभीर स्थिती आहे, राज्यात अन्यत्र अशा घटनांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे, प्रशासनाला तांत्रिक चुका टाळण्यासाठी स्पष्ट सूचना देणे गरजेचे आहे, असं भाजप नेते आमदार सुधीर मुनगुंटीवार यांनी म्हटलं आहे.

पार्श्वभूमी

नाशिक : नाशिकच्या नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.  राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता.


व्हेंटिलेटरवर असलेल्य़ा रुग्णांना ऑक्सिजन प्रेशर कमी पडल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला असल्याचं मांढरे यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की, ही एक खाजगी कंपनीची टाकी आहे. रिफिल करण्याकरता आणि मेंटेनन्सकरता टॅंकर आला होता.  त्यात काही टेक्निशियन्स होते. तो टॅंकर रिफिल करण्यात आला होता, असं आयुक्तांनी सांगितलं, मात्र दरम्यानच्या काळात झालेल्या विस्कळीतपणामुळं ही घटना घडली, असं जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितलं. याबाबत सर्व माहिती शासन स्तरावर माहिती कळवली आहे, असं त्यांनी सांगितलं. 


या दुर्घटनेनंतर रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरु आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहता पोलीसही रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकची गळती रोखली असून पुरवठा पूर्ववत झाला आहे. या घटनेत 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील एकूण 150 रुग्ण व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर होते. त्यापैकी 131 रुग्ण ऑक्सिजनवर होते आणि 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असं नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं होतं.  


दुसरीकडे शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या गळतीमध्ये 30 ते 35 रुग्ण दगावले असतील, अशी भीती व्यक्त करत जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.


वॉल्वमध्ये लीकेज असल्याने गळती : राजेश टोपे
स्थानिक प्रशासनाने कळवलं की, नाशिकमध्ये आलेल्या टँकरमधील वॉल्वमध्ये लीकेज असल्याने ऑक्सिजन वाया गेला. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण माहिती घेऊन परिपत्रक जारी केलं जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.


निष्काळजीपणामुळे आणखी किती बळी घेणार? : प्रवीण दरेकर
नाशिकमधील ऑक्सिजन गळती दुर्दैवी आहे. ही सर्वस्वी सरकारची चूक आहे, असं म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली. तसचं निष्काळजीपणामुळे आणखी किती बळी घेणार असा सवालही विचारला. दरम्यान जबाबदार असणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.  


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.